आता गावपातळीवर लसीकरण जनजागृती मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:27+5:302021-06-16T04:53:27+5:30

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जनजीवन अधिक प्रभावित झाले. ग्रामीण भागातही अधिक संख्येने कोरोना रुग्ण आढळून आले. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ...

Now vaccination awareness campaign at village level! | आता गावपातळीवर लसीकरण जनजागृती मोहीम!

आता गावपातळीवर लसीकरण जनजागृती मोहीम!

Next

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जनजीवन अधिक प्रभावित झाले. ग्रामीण भागातही अधिक संख्येने कोरोना रुग्ण आढळून आले. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरण, लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे; मात्र काही नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात गैरसमज असल्याने काही ठिकाणी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात काही गैरसमज असल्यास ते दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम हाती घ्यावी. तलाठी, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने घरोघरी जावून लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून द्यावे, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी केल्या. या अनुषंगाने ग्रामीण भागात लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

०००

कोट बॉक्स

कोरोनावर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांनी कोणताही गैरसमज किंवा अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.

- डॉ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.

Web Title: Now vaccination awareness campaign at village level!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.