ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ३०० च्या खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:29 AM2021-06-25T04:29:10+5:302021-06-25T04:29:10+5:30
................... रस्ता कामे रखडली; नागरिक हैराण वाशिम : शहरातील जुनी आययूडीपी काॅलनी, पाटणी चाैक ते अकोला नाका यासह इतर ...
...................
रस्ता कामे रखडली; नागरिक हैराण
वाशिम : शहरातील जुनी आययूडीपी काॅलनी, पाटणी चाैक ते अकोला नाका यासह इतर ठिकाणच्या रस्त्याची कामे रखडली आहेत. पावसामुळे त्यात व्यत्यय येत असून गैरसोयीमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.
...................
पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था
वाशिम : शहर पोलीस स्टेशननजीक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झालेली आहे. परिसरात घाण पसरत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
.................
शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा
वाशिम : जिल्ह्यात काही ठिकाणी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे सुमारे २० टक्के शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हाती घेतलेली नाही. पेरणीलायक पाऊस होण्याची प्रतीक्षा संबंधित शेतकऱ्यांना लागून आहे.
..................
जिल्ह्यात वटवृक्षांची विक्रमी विक्री
वाशिम : गुरुवारी वटपाैर्णिमेचा सण महिला मंडळींनी हर्षोल्लासात साजरा केला. विशेषत: अनेकांनी रोपवाटिकांमधून वटवृक्ष विकत आणून घरीच पूजाअर्चा केल्याचे दिसून आले. या माध्यमातून वटवृक्षांची विक्रमी विक्री झाल्याचे दिसून आले.