मालेगाव तालुक्यात काेरोना रुग्णांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:39 AM2021-03-06T04:39:37+5:302021-03-06T04:39:37+5:30
मालेगाव :- कोरोना रुग्ण संख्या आता वाढत असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे कारण जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित ...
मालेगाव :- कोरोना रुग्ण संख्या आता वाढत असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे कारण जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित मालेगावात आहेत. ४ मार्च रोजी तालुक्यात ११३ रुग्ण निघाले आहेत . त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
शहरात आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दुकाने उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे . प्रशासनाने वारंवार सूचना दिल्या आहे की कोणीही कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तोंडाला मास्क लावा, सॅनिटायझरचा उपयोग करावा तरीही अनेक नागरिक विना मास्क फिरताना दिसत आहे, कोणीही त्याची काळजी करायला तयार नाही. त्यामुळे शहरात तसेच तालुक्यात कोरोना बाधित वाढत आहेत. ४ मार्च रोजी आलेल्या अहवालावरून संपूर्ण जिल्ह्यातील केवळ मालेगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. मालेगाव तालुक्यात ११३ रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे . वाशिममध्ये ३१, रिसोडमध्ये ४, मंरुळपीर २७, कारंजा १५, मानोरा ० असे रूग्ण आढळून आले. एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात १९० बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये बाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझर याचा उपयोग करावा असे आवाहन मालेगाव नगरपंचायतचे मुख्य अधिकारी डॉक्टर विकास खंडारे यांनी केले आहे.