कन्टेनमेंट झोनची संख्या झाली कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:38 AM2021-04-03T04:38:25+5:302021-04-03T04:38:25+5:30
जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत १६६९९ लोकांना कोरोना संसर्ग झाला. यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून कोरोना नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कठोर उपाय ...
जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत १६६९९ लोकांना कोरोना संसर्ग झाला. यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून कोरोना नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कठोर उपाय योजनाही केल्या जात आहेत. त्यात कोरोना बाधितांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात येत असताना त्याचे पालन पूर्णपणे होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणाºयांवर गुन्हा दाखल केला जात आहे. शिवाय बाधितांच्च्या घराचा परिसर कन्टेनमेंट झोन जाहीर केला जात आहे. गंभीर लक्षणे नसलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवले जात असले तरी, त्यांचा इतरांशी संपर्क होऊ नये आणि त्यांनी दक्षता बाळगावी म्हणून बाधितांच्या घराचा परिसर कन्टेनमेंट झोन जाहीर केला जात आहे. यामुळे कन्टेनमेंट झोनची संख्या वाढली होती; परंतु याचा चांगला परिणाम झाला असून, बाधितांचा इतरांशी संपर्क न आल्याने आता कारंजा, मानोरा, मालेगाव तालुक्यातील कन्टेनमेंट झोनची संख्या कमी झाली आहे.
---------------
जानोरीत पाणलोटचे नियोजन
वाशिम: समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी असलेल्या जानोरी येथील गावकºयांनी शुक्रवारी शिवार फेरीचे आयोजन करून आपले आदर्श पाणलोट नियोजन केले. यात गावातील एकूण नाला खोलीकरण, नाल्यावरील उपचार, गॅबियन बंधारे, एलबीएस, कंपार्टमेंट बंडिंग, शेततळ्यांचा समावेश आहे.