कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:44 AM2021-05-11T04:44:02+5:302021-05-11T04:44:02+5:30

............... वाशिम शहरात रस्त्यांवर शुकशुकाट वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९ मे पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे ...

The number of corona tests increased | कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले

कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले

Next

...............

वाशिम शहरात रस्त्यांवर शुकशुकाट

वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९ मे पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे दवाखाने व मेडिकल वगळता इतर दुकाने, आस्थापना बंद असल्याने दिवसभर शहरात शुकशुकाट दिसून येत आहे.

................

नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

वाशिम : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहर परिसरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारक घराबाहेर पडू नये. नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती ठाणेदार धृवास बावनकर यांनी दिली.

................

पाणीपुरवठा योजनांचे देयक अदा करा

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनांचे कोट्यवधी रुपयांचे विद्युत देयक थकीत आहे. यामुळे महावितरण आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून, ग्रामपंचायतींनी देयक अदा करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी केले.

...............

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा

वाशिम : जिल्ह्यात १९ ते २१ मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट होऊन शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविला असून, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा लागून आहे.

.................

जऊळका येथे प्लास्टिक बंदीचा फज्जा

वाशिम : शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, यादृष्टीने कार्यवाही करावी. तसेच ग्रामीण भागातही नियमाची अंमलबजावणी करून प्लास्टिक पिशवीची विक्री अथवा वाहतूक होत असल्यास दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

................

किन्हीराजात रुग्णांची झाली सोय

वाशिम : आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्याला नीती आयोगाकडून मिळालेल्या निधीतून १० रुग्णवाहिका मिळाल्या. किन्हीराजालाही रुग्णवाहिका मिळाल्याने रुग्णांची सोय झाली आहे.

....................

मालेगावचे क्रीडा संकुल ओस

मालेगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मैदानी खेळ बंद आहेत. यामुळे मालेगाव येथील तालुका क्रीडा संकुल खेळाडूंअभावी ओस पडले असून, शासनाने खेळांना नियमांच्या अधीन राहून परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

.................

ड्रम, टायरांमुळे वाहतुकीस अडथळा

वाशिम : कारंजाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. दस्तापूर गावानजीक वनविभागाने त्यांच्या ताब्यात असलेल्या रस्त्याच्या मधोमध ड्रम व टायर उभे केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

.............

दुर्धर आजारग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

वाशिम : हृदयरोग, किडनी व कर्करोग, आदी दुर्धर आजाराने पीडित लाभार्थ्यांना औषधोपचाराकरिता जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे प्रत्येकी १५ हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. सन २०२० मध्ये २७ प्रस्ताव मंजूर झाले असून, संबंधितांना मदतीची प्रतीक्षा लागून आहे.

................

‘त्या’ अधिनियमाच्या अंमलबजावणी मागणी

वाशिम : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगत्व तपासणी, मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजवणी करण्यात यावी, अशी मागणी येथील दिव्यांग लाभार्थींनी सोमवारी केली.

............

किन्हीराजा येथे आरोग्य तपासणी

वाशिम : किन्हीराजा येथे कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यानुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यासोबतच आरोग्य विभागाने रविवारी गावात नागरिकांची आरोग्य तपासणी केली.

..................

स्मशानभूमींसाठी निधीची प्रतीक्षा

वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अतिरिक्त निधी मिळाल्यास स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. १५ कोटींचा अतिरिक्त निधी केव्हा मिळणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

..............

मास्कचा वापर करण्याकडे विशेष लक्ष

वाशिम : कोरोनाचा आलेख वाढत असल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक नागरिकाच्या तोंडावर मास्क लावलेला दिसत आहे. विशेष बाब म्हणजे काही नागरिक डबल मास्क लावतानाही आढळत आहेत.

..................

कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या!

वाशिम : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस बळावत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कुठलीच हयगय न बाळगता कोरोनापासून बचावासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.

Web Title: The number of corona tests increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.