कारंजात रुग्णसंख्येचा आलेख खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:28 AM2021-06-26T04:28:18+5:302021-06-26T04:28:18+5:30

................. जिल्हा रुग्णालयातील पाणीप्रश्न सुटणार वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या ...

The number of patients in the fountain dropped | कारंजात रुग्णसंख्येचा आलेख खालावला

कारंजात रुग्णसंख्येचा आलेख खालावला

Next

.................

जिल्हा रुग्णालयातील पाणीप्रश्न सुटणार

वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत असून हा प्रश्न विनाविलंब निकाली काढू, अशी ग्वाही जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ मधुकर राठोड यांनी दिली.

..................

घरकूल कामांना वेग देण्याची मागणी

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा संकट आता बहुतांशी ओसरला आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात रेती उपलब्ध करून अर्धवट अवस्थेत रखडलेल्या घरकुलांच्या कामांना गती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

.................

पूल नादुरुस्त; अडचण जाणवणार

वाशिम : कारंजा तालुक्यातील हिंगणवाडी ते रामटेक या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम रखडले असून पुलाची दुरुस्तीही प्रलंबित आहे. यामुळे पूरपरिस्थिती ओढवल्यास विशेष अडचण जाणवणार असल्याचे बोलले जात आहे.

................

बँकांमध्ये गर्दी; नियमांचे उल्लंघन

वाशिम : शहरातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे. नागरिकांनीही सतर्क राहायला हवे, असा सूर उमटत आहे.

.........................

संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन

वाशिम : युवक-युवतींना रोजगार तथा स्वयंरोजगाराची तसेच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सातत्याने करण्यात येत आहेत. युवक, युवतींनी संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.

...........

अरुंद रस्त्यामुळे रहदारीस अडथळा

वाशिम : तालुक्यातील अनसिंग येथे अरुंद रस्त्यांमुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरासमोर वाहन उभे केल्यानंतर वाद होऊन त्याचे रूपांतर भांडणात होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. हा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.

..............

वाशिम पोलिसांनी रात्रगस्त वाढविली

वाशिम : चोऱ्या, घरफोड्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाशिम पोलिसांनी रात्रगस्त वाढविली आहे. कुठेही संशयास्पद प्रकार आढळून आल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

.............

उद्योगांना पाणी पुरविण्याची मागणी

वाशिम : येथील एमआयडीसीमध्ये जेमतेम ११ ते १२ उद्योग सुरू आहेत. त्यांनाही पुरेसे पाणी मिळत नाही. एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढवून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी उद्योजकांमधून होत आहे.

...............

बॉटलमध्ये दिले जातेय पेट्रोल

वाशिम : शहरात पेट्रोलमुळे कुठेही अनुचित घटना घडू नये, याकडे पोलिसांनी लक्ष पुरवून मध्यंतरी बाॅटलमध्ये पेट्रोल देणाऱ्या पेट्रोलपंपांवर कारवाईचे सत्र अवलंबिले होते; मात्र गेल्या काही दिवसांत कारवाई थंडावल्याने हा प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे.

..................

रोहयो घोटाळ्याच्या तपासाकडे दुर्लक्ष

वाशिम : मालेगाव तालुक्यातील मारसूळ येथे रोहयोच्या कामात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी १४ आरोपींवर गुन्हे दाखल झाले; मात्र या प्रकरणाचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू असून त्यास गती देण्याची मागणी होत आहे.

Web Title: The number of patients in the fountain dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.