Nurse Day Special : घर सांभाळून ‘त्या’ करताहेत रुग्णांची सुश्रूषा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:30 AM2020-05-12T11:30:46+5:302020-05-12T11:31:01+5:30
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कर्तव्य बजावणाºया ४० ते ५० परिचारिकांचा घर ते रुग्णालय या दरम्यानचा प्रवास थक्क करणारा आहे.
- संतोष वानखडे
वाशिम : ‘रुग्णसेवा हेच खरे व्रत’ असे मानून आपले संपूर्ण जीवन या कार्यात घालवणाऱ्या परिचारिका कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटसमयीदेखील तेवढ्याच तत्परतेने आपले कर्तव्य बजावून रूग्णांची सुश्रूषा करीत आहेत. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कर्तव्य बजावणाºया ४० ते ५० परिचारिकांचा घर ते रुग्णालय या दरम्यानचा प्रवास थक्क करणारा आहे.
एकीकडे कामाचे वाढणारे तास, असुरक्षितता तर दुसरीकडे स्वत:च्या कौटुंबीक जबाबदाºया अशा दुहेरी कसरतीच्या ओझ्याखाली परिचारिका त्यांचे जीवन व्यतित करत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परिचारिकांची जबाबदारी वाढली असून, अशा परिस्थितीत न डगमगता त्या सेवा देत आहेत. ग्रामीण भागातील काही परिचारिकांना आवश्यक ती सुरक्षित साधने उपलब्ध नसतानाही या परिचारिका घर सांभाळून रुग्णसेवेसाठी तत्पर आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात सेवा देणाºया परिचारिकांना घरी परतताना, आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी म्हणून स्वत: होम क्वारंटीनही व्हावे लागते. इतर कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ असले तरी आमच्यासाठी मात्र ‘ड्यूटी फॉर पेशन्टस्’ असून, रुग्णसेवेतून आत्मिक समाधान मिळत असल्याचे परिचारिका अभिमानाने सांगतात.
रुग्णसेवेत परिचारिका
जिल्हा रुग्णालयातील मेट्रन हंसा कांबळे, सखू हजारे यांच्यासह ६६ परिचारिका सेवा देत आहेत. यापैकी विलगीकरण कक्षात ४० ते ४५ परिचारिका सेवा देत आहेत. विलगीकरण कक्षातील परिचारिकांना कुटुंबासह संदिग्ध रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. यामध्ये चांगलीच कसरत होत आहे.
रुग्णसेवेचे व्रत हाती घेतले असून, त्याअनुषंगाने कर्तव्याबरोबरच सामाजिक भान म्हणून सेवा देण्याचा प्रयत्न आहे. घर ते रुग्णालय या दरम्यानच्या जबाबदाºया पार पाडताना थोडीफार कसरत तर होतेच; परंतू, रूग्ण बरा झाल्यानंतर त्यांच्या चेहºयावर फुललेले हास्य पाहून रुग्णसेवेचे चिज झाल्याचे समाधानही मिळते. - पुनम खंडारे,
परिचारिका
जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्तव्य पार पाडताना विविध आजाराच्या रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळते. कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटसमयी तर खरी कसोटी आहे. अशा परिस्थितीतही कोणतीही तमा न बाळगता सर्व परिचारिका आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. रुग्ण हीच खºया अर्थाने ईश्वरसेवा आहे.
-राखी काळे, परिचारिका