येवता येथे पोषण परसबाग मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:24+5:302021-06-29T04:27:24+5:30

ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत प्रभाग समन्वयक अविनाश गंगावणे व किंनखेडा येथील आयसीआरपी कल्पना शिवाजी अवचार आयसीआरपी कविता गोडघासे व ...

Nutrition kitchen garden campaign at Yevta | येवता येथे पोषण परसबाग मोहीम

येवता येथे पोषण परसबाग मोहीम

Next

ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत प्रभाग समन्वयक अविनाश गंगावणे व किंनखेडा येथील आयसीआरपी कल्पना शिवाजी अवचार आयसीआरपी कविता गोडघासे व कृषी सखी दुर्गा मांडे यांनी किंनखेडा येथील महिला शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परस पोषण बाग आखणी केली व उपस्थित महिला शेतकऱ्यांना बी, बियाणे त्याची लागवड संगोपन, जोपासना कशी करावी, याचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे महिलांनाही परसबागेतील भाजीपाला पिकावर कोणतेही रासायनिक फवारणी न करता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला व विषमुक्त अन्न मिळणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांचे आरोग्य उत्कृष्ट राहण्यास मदत मिळणार आहे आणि दवाखान्याचा खर्च कमी होण्यास मदत होऊन आर्थिक बचत होण्यास महिलांचा आपल्या कुटुंबास हातभार लागणार आहे.

-------------

महिलांना मोहिमेत सहभागाचे आवाहन

ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत किनखेडा येथील महिला शेतकरी ज्योती सतीश अवचार यांच्या शेतात परसबागेची आखणी करण्यात आली. यावेळी आयसीआरपी कल्पना अवचार, कविता गोडघासे, कृषी सखी दुर्गा मांडे, प्रभाग समन्वयक कवठा अविनाश गंगावणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून पोषण परसबाग तयार करावी, असे आवाहन अविनाश गंगावणे प्रभाग समन्वयक उमेद पंचायत समिती रिसोड यांनी केले आहे.

Web Title: Nutrition kitchen garden campaign at Yevta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.