तोंडगाव, केकतउमरा येथे पोषणमाह कार्यक्रम.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:41 AM2021-09-19T04:41:56+5:302021-09-19T04:41:56+5:30
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत तोंडगाव सर्कलमध्ये पोषण माह महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत ...
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत तोंडगाव सर्कलमध्ये पोषण माह महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शनिवारी तोंडगाव व केकतउमरा येथे पोषणविषयक माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तोंडगावच्या सरपंच चंदा गोटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील दिगांबर गोडघासे तसेच कैलास ढोले हे उपस्थित होते. पर्यवेक्षिका नूतन धोटे यांनी उपस्थित गरोदर महिला, किशोरवयीन मुली, लहान बालके तसेच गावकऱ्यांसमोर पोषणाचे महत्त्व पटवून देतांना अनिमिया, डायरिया, स्वच्छता, पौष्टिकता व बालकाचे पहिले १००० दिवस या पाच सूत्रांबाबतची माहिती विषद केली. आहार चांगला असेल तर आचार विचार आणि पर्यायाने सुपोषित बालकांची पिढी घडविता येते असे सांगितले. किशोरवयीन मुली, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके यांचे पोषण योग्यप्रकारे होणे हे आपले ध्येय आहे आणि काळाची गरज असल्याचे म्हटले. केकतउमरा येथील कार्यक्रमाला बँकसखी अलका हजारे, कृषीसखी माधुरी नेतनेस्कर, सीआरपी पार्वती पायघन, ग्रामसंघ सदस्य सविता बोराळकर व बचतगट सदस्या उपस्थित होत्या. जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे तसेच वाशिम ग्रामीणच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांच्या मार्गदर्शनात तोंडगाव सर्कलच्या पर्यवेक्षिका नूतन धोटे सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस,आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने विविध कार्यक्रम राबवित आहेत.
-------------------