हरकती, आक्षेप मागविले!
By admin | Published: February 5, 2017 02:11 AM2017-02-05T02:11:13+5:302017-02-05T02:11:13+5:30
समृद्धी महामार्ग जमीन एकत्रीकरण योजना.
वाशिम, दि. ४- नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग जमीन एकत्रीकरण योजनेच्या प्रारंभिक अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात २१ डिसेंबर २0१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. सदर अधिसूचनेवर प्रसिद्धीपासून ९0 दिवसांच्या आत सक्षम प्राधिकार्याकडे हरकती, सूचना, आक्षेप सादर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले.
शासनाच्या दृष्टीने शेतकर्यांच्या समृद्धीचा महामार्ग असलेल्या नागपूर-मुंबई या मार्गासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्ग जमीन एकत्रीकरण योजनेच्या प्रारंभिक अधिसूचनेच्या प्रसिद्धीपासून ४५ दिवसाच्या आत विहीत नमुन्यात लेखी स्वरूपात सक्षम प्राधिकार्याकडे हरकती, सूचना व ऐच्छिक सहभागाबाबत संमती दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. आता याबाबतचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. प्रारंभिक अधिसूचना प्रसिद्धीच्या दिनांकापासून ९0 दिवसांच्या आत सक्षम सक्षम प्राधिकार्याकडे हरकती व ऐच्छिक सहभागबाबत संमती सादर करण्यासाठी किंवा अशा प्राधिकार्यासमोर हजर होण्यासाठी कालावधी वाढवून दिला आहे. काही हरकती वा आक्षेप असल्यास सक्षम प्राधिकार्याकडे सादर कराव्यात, असे सक्षम अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वाशिम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.