मानोरा येथील मतदार यादीवर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:56 AM2021-02-25T04:56:39+5:302021-02-25T04:56:39+5:30
मानोरा येथे पूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात होती. गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रुपांतर झाले. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी तयार ...
मानोरा येथे पूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात होती. गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रुपांतर झाले. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात आली. या सर्वच याद्यांमध्ये बाहेरगावातील मतदारांची नावे समाविष्ट असून काही उमेदवारांच्या मर्जीमधील लोकांचाही यादीमध्ये भरणा करण्यात आलेला आहे. ती नावे प्रथम प्राधान्याने वगळणे आवश्यक आहे. तेव्हाच यादी व्यवस्थित होऊन खोट्या मतदारांचा शोध लागणार आहे. दरम्यान, या मुद्यावर आक्षेप घेत अरुण राठोड आणि इप्तेखार पटेल यांनी बोगस मतदारांची नावे यादीतून विनाविलंब वगळण्यात यावीत, अशी मागणी लावून धरली. त्याची दखल घेत नगर पंचायतच्या जगदीश नागलोथ, बंडू तेलकुंटे या कर्मचाऱ्यांनी २३ फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक ७ मध्ये येऊन मतदार यादीचे प्रत्यक्ष वाचन केले. या प्रभागात जे मतदार वास्तव्याला नाहीत, त्यांची नावे वगळण्यात येणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहे.