कर्ज योजनेसाठी १३० लाभार्थींचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:47 PM2019-07-10T14:47:01+5:302019-07-10T14:47:26+5:30
वाशिम जिल्ह्यासाठी १ लाख रुपयाच्या आतील व्यवसायासाठी ७५ तर १ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या व्यवसायाकरिता ५५ लाभार्थींचे उद्दिष्ट मिळाले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्यावतीने राष्ट्रीयकृत बँकांमार्फत राबविण्यात येणाºया कर्ज योजनेकरिता वाशिम जिल्ह्यासाठी १ लाख रुपयाच्या आतील व्यवसायासाठी ७५ तर १ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या व्यवसायाकरिता ५५ लाभार्थींचे उद्दिष्ट मिळाले आहे. या कर्ज योजनेत महामंडळाचा १५ टक्के तर अर्जदाराचा १० टक्के सहभाग असून बँकेचा ७५ टक्के सहभाग राहणार आहे.
कर्ज योजनेतून १ लाख रुपयाच्या आतील व्यवसायाकरिता पीठ गिरणीसाठी ३, पेपर डिश किंवा ज्यूस सेंटरसाठी ३, दुग्ध व्यवसाय युनिटसाठी ३०, मंडप डेकोरेशन व लाउडस्पीकर केंद्रासाठी ५, मळणी युनिटसाठी ३, आॅटो वर्कशॉपसाठी १०, किराणा दुकानासाठी ५, कापड दुकानासाठी ३, इलेक्ट्रिक दुकानासाठी ३, पापड, मसाला, शेवाळ्या या खाद्य उद्योगासाठी ५ आणि कटलरी दुकानासाठी ५ असा एकूण ७५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. तसेच १ लाख रुपयांच्यावरील व्यवसायामध्ये वीटभट्टी युनिटकरिता ५, कापड दुकानाकरिता ९, डीटीपी संगणक किंवा झेरॉक्स सेंटरकरिता ५, हॉटेल किंवा ढाबाकरिता ५, स्टेशनरी दुकान ५, खत बियाणे दुकानाकरिता ५, ट्रॅक्टर ट्रॉली करिता ५, पॉवर ट्रिलर (लहान) करिता ५, मालवाहू मिनी ट्रककरिता २, प्रवासी वाहनाकरिता ५, मालवाहू रिक्षाकरिता २ व औषधी दुकानाकरिता २ याप्रमाणे ५५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. कर्ज वाटप योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज महामंडळाच्या यवतमाळ येथील कार्यालयातून प्राप्त करून घेण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१९ पर्यंत असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत आहे. वाशिम जिल्ह्यातील इच्छुकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या यवतमाळ शाखा व्यवस्थापकांनी केले आहे.