जागतिक शौचालय दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यात गावोगावी ‘कृती कार्यक्रम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:59 PM2017-11-17T14:59:31+5:302017-11-17T14:59:51+5:30
वाशिम : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून प्रत्येक तालुक्यातून किमान पाच अशा एकूण २५ ते ३० गावांत हगणदरीमुक्तीबाबत प्रत्यक्ष कृती कार्यक्रम घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी जिल्हा स्वच्छता व पाणी कक्ष तसेच गटविकास अधिकाºयांना केल्या.
वाशिम : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून प्रत्येक तालुक्यातून किमान पाच अशा एकूण २५ ते ३० गावांत हगणदरीमुक्तीबाबत प्रत्यक्ष कृती कार्यक्रम घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी जिल्हा स्वच्छता व पाणी कक्ष तसेच गटविकास अधिकाºयांना केल्या.
जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात काही गावांतील नागरिकांचे असहकार धोरण कारणीभूत ठरत आहे. वारंवार सूचना, विनंती, पाठपुरावा करूनही रिसोड, मानोरा, वाशिम, मालेगाव तालुक्यातील काही नागरिकांचे म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याने अद्याप ४५ हजार शौचालयांचे बांधकाम होऊ शकले नाही. मंगरूळपीर तालुक्यात ४७०० शौचालय बांधकाम बाकी आहे. जागतिक शौचालय दिनी उद्दिष्टांपासून कोसोदूर असलेल्या गावांत कृती कार्यक्रम घेऊन व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी केल्या.
गावात शौचालयाचे बांधकामांना सुरुवात करणे तसेच सुरु असलेल्या कामांचा शेवट करणे अर्थात देयक अदा करणे आणि त्याची आॅनलाईन नोंद घेणे, शौचालयाच्या शोष खड्यांसाठी श्रमदान करणे तसेच शक्य असेल तेथे जेसीबी लावणे, कामे सुरु असल्यास गवंडी, मिस्री यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, लोकप्रतिनीधिंच्या हस्ते प्रतिकात्मक शौचालय बांधकाम, उदघाटन, शौचालय बांधणाºया कुटुंबाचा सत्कार आदी उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. गावात असलेल्या स्वच्छता प्रेरकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. या उपक्रमात जिल्हा किंवा तालुका स्तरावरील सर्व लोकप्रतिनिधींचा सहभाग व पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. निवडलेल्या गावात पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होतील याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही गणेश पाटील यांनी केल्या आहेत.
निवडलेल्या गावांसह तालुक्यातील इतर गावांची हगणदरीमुक्त घोषित होण्याची तारीख निश्चित करणे, कमी उद्दिष्ट असलेल्या गावांना या दिवशी १९ नोव्हेंबरला हगणदरीमुक्त म्हणून घोषित करण्याचे नियोजन करावे, काही शंका असल्यास थेट उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी संपर्क साधावा, असे आवाहनही गणेश पाटील यांनी केले.