अवकाळी पावसाचा पिकांना जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 09:13 AM2020-04-02T09:13:33+5:302020-04-02T09:13:45+5:30

शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा यासह फळपिकांना फटका बसल्याने शेतकरी अधिकच संकटात अडकला आहे.

Occasional rains hit crops in Washim | अवकाळी पावसाचा पिकांना जबर फटका

अवकाळी पावसाचा पिकांना जबर फटका

Next

लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम : जिल्हाभरात २९ ते ३१ मार्च या दरम्यान वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा यासह फळपिकांना फटका बसल्याने शेतकरी अधिकच संकटात अडकला आहे.
गत सहा दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, २३ मार्च रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानाचा सर्वे होत नाही, तोच पुन्हा २९ मार्च रोजी वाशिम शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस झाला. यामुळे काढणीवर आलेला गहू आणि हरभºयाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर ३० मार्च आणि ३१ मार्च रोजीदेखील वादळवाºयासह जिल्हयात सर्वदूर अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा यासह फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे केले जात नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
कार्ली परिसरात गारपिट
कार्ली : ३१ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजतादरम्यान कार्ली परिसरात वादळी वाºयासह गारपीट झाल्याने हाताशी आलेल्या रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
च्गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. सध्या शेतात गहू, हरबरा काढणी सुरू आहे. परंतू, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. ३१ मार्च रोजी गारपिट झाल्याने ४०० ते ५०० एकरातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गहू, हरभरा यासह कांदा व फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. वाशिम तालुक्यातील कार्ली परिसर, अडोळी, नागठाणा, तोंडगाव परिसरासह मालेगाव तालुक्यातील राजूरा, जऊळका रेल्वे, मुंगळा यासह २० ते २५ गावांत ३१ मार्चला सायंकाळी वादळवाºयासह अवकाळी पाउस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

२३ मार्चपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात वादळवाºयासह अवकाळी पाऊस पडत आहे. ३१ मार्चलादेखील अवकाळी पाऊस झाला. परंतू, या पावसामुळे पिकांचे फारसे नुकसान नाही. पीक नुकसानाची माहिती संकलित केली जात आहे. तथापि, प्राथमिक अंदाजानुसार पिकांचे नुकसान झाल्याचे आढळले नाही.
-एस. एम. तोटावार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Occasional rains hit crops in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.