घराबाहेर फिरल्याने कोरोनाबाधिताविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:19+5:302021-05-09T04:42:19+5:30
मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ग्रा.पं. सचिव तथा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सचिव मोहन पिराजी वानखडे यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला ...
मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ग्रा.पं. सचिव तथा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सचिव मोहन पिराजी वानखडे यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की, गावातील एका कोरोनाबाधिताला गृहविलगीकरणात राहण्याचे सांगण्यात आले होते. मात्र ते घरात न राहता गावतील बाबाराव सारंग गुट्टे यांच्यासोबत ५२ पत्ते खेळत असताना आढळले. कोरोना संक्रमित असूनही बाहेर फिरून कोरोना प्रसार करत असल्यामुळे त्यांच्यावर मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये भादंवि १९८६ अंतर्गत कलम १८८ व २६९,२७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वतः कोरोना संक्रमित असताना बाहेर फिरणे म्हणजे दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे आहे. हा एकप्रकारचा मोठा अपराध असून यापुढेही कोरोना संक्रमित बाहेर पडले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली जात आहे.