लघुसिंचन विभागाचे कार्यालय, निवासस्थाने ‘डेंजर झोन’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:32 AM2017-08-01T01:32:05+5:302017-08-01T01:32:37+5:30
मानोरा : येथील लघुसिंचन विभागाचे कार्यालय व निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, भिंतींना तडे गेले आहेत. ठिकठिकाणी बांधकाम खचले आहे, तर निवासस्थानात सुविधा नाही. कर्मचारी मात्र या इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : येथील लघुसिंचन विभागाचे कार्यालय व निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, भिंतींना तडे गेले आहेत. ठिकठिकाणी बांधकाम खचले आहे, तर निवासस्थानात सुविधा नाही. कर्मचारी मात्र या इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत.
सिंचन शाखा क्र.१ व २ व सिंचन उपविभाग आणि वसाहत अनेक वर्षांपासून बांधले आहे. बांधकाम दर्जाहीन झाल्याने अनेक भिंतींना तडे गेले आहेत, तसेच आजुबाजूला गवत, झुडपे वाढले आहेत, त्यामुळे सरपटणाºया प्राण्यांचा धोका आहे. दरवाजे तुटले, फाउंडेशन क्रॅक झाले. फरशी दबली तसेच पावसात अनेक ठिकाणी पाणी गळते, अशा अवस्थेत कर्मचारी तेथे काम करतात. कोणत्याही शासकीय कार्यालय व वसाहतीच्या देखभाल दुुरुस्तीसाठी दरवर्षी निधी येतो, मग हा निधी कोठे जातो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
इमारत व निवासस्थाने जीर्ण झाल्याने केव्हाही अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
महिला कर्मचाºयांची होते कुचंबणा
शासनाच्यावतीने शौचालय बांधण्यावर सध्या मोठा भर आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात; मात्र या कार्यालयात महिलांसाठी मुतारी व शौचालय नाही, त्यामुळे महिला कर्मचाºयांची कुचंबना होत आहे.
येथील सिंचन विभागाचे कार्यालय व निवासस्थानांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. २०१७-१८ प्रापन सुची अंतर्गत साडेसहा लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. ते वरिष्ठ विभागाकडे पाठविले आहे. ते मंजूर झाल्यानंतर दुरुस्तीची कामे केल्या जातील.
- व्ही.पी.तिडके
सहायक कार्यकारी अभियंता, पाटबंधारे उपविभाग, मानोरा.