कार्यालयात पार्किंग, नो-पार्किंग फलक एकाच जागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:41 AM2021-03-05T04:41:33+5:302021-03-05T04:41:33+5:30

---------------- तलाठ्यांची ६ पदे रिक्त वाशिम : तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावांत शेतकरी, ग्रामस्थांना विविध प्रकारचे दाखल देण्यासाठी तलाठ्यांची उणीव ...

Office parking, no-parking panels in one place | कार्यालयात पार्किंग, नो-पार्किंग फलक एकाच जागी

कार्यालयात पार्किंग, नो-पार्किंग फलक एकाच जागी

Next

----------------

तलाठ्यांची ६ पदे रिक्त

वाशिम : तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावांत शेतकरी, ग्रामस्थांना विविध प्रकारचे दाखल देण्यासाठी तलाठ्यांची उणीव भासत आहे. तालुक्यात तलाठ्यांची सहा पदे रिक्त असल्याने शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांना अडचणी येत आहेत.

----------------

पशुचिकित्सालय इमारतींची दुरवस्था

वाशिम : पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हाभरातील ८ ठिकाणच्या पशुचिकित्सालय इमारतींची अवस्था वाईट आहे. त्यामुळे पशुपालकांसह कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना पशूंवर उपचार करण्यासह इतर कामकाज करताना अडचणी येत आहेत.

----------------

भूमी अभिलेख कार्यालयात गर्दी

वाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जमीन मोजणीसह खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी व इतर नागरिक नोंदणी व दस्तऐवजासाठी भूमी अभिलेख कार्यालयात धाव घेत असल्याने याठिकाणी गर्दी होत असल्याचे गुरुवारी दिसले.

--------------------

बाजार समितीत निर्जंतुकीकरण

वाशिम : जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत शेतमाल घेऊन येणारे शेतकरी व इतरांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. यासाठी गुरुवारी वाशिम बाजार समितीत संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले.

--------------------

एकबुर्जी प्रकल्पात ४२ टक्के साठा

वाशिम : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट येत आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात ४२ टक्के उपयुक्त साठा असला तरी सिंचनासाठी उपसा होत असल्याने पुढे पातळी खालावून पाणीपुरवठा प्रभावित होण्याचा धोका संभवतो.

Web Title: Office parking, no-parking panels in one place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.