विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय मेडशीपासून दोन किलोमीटर अंतरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:15 AM2021-03-13T05:15:49+5:302021-03-13T05:15:49+5:30
येथील ग्रामस्थांना व परिसरातील ग्रामस्थांना विद्युत कंपनीबाबत आणि आपल्या विद्युत कनेक्शनबाबत काही अडचणी असल्यास त्यांना मेडशीपासून दोन किमी ...
येथील ग्रामस्थांना व परिसरातील ग्रामस्थांना विद्युत कंपनीबाबत आणि आपल्या विद्युत कनेक्शनबाबत काही अडचणी असल्यास त्यांना मेडशीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या ३३ के.व्ही. केंद्रावर कार्यरत असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या शाखा कार्यालयामध्ये जावे लागते. जाण्याकरिता कोणतेही साधन नसल्यास तत्काळ बसावे लागते. याची दखल घेत मेडशी ग्रामपंचायतीने त्यांच्या परिसरातील उपलब्ध असलेली जागेतील एक रूम विद्युत वितरण कंपनी देण्यास पुढाकार घेतला आहे. यावर विद्युत वितरण कंपनी काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत परिसरातील जागेमध्ये बीएसएनएलचे कार्यालय, पोस्ट ऑफिस हे सध्या कार्यरत आहे. हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी, आरोग्य वर्धिनी केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागनाथ माध्यमिक विद्यालय, उर्दू शाळा, सेवा सहकारी सोसायटी असे कार्यालयाबरोबर आठवडी बाजार आहे . येथे विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय आल्यास जनतेचा त्रास कमी होऊ शकतो. याची दखल घेत ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे. यावेळी धीरज मंत्री, ग्रा.पंं. सदस्य अमोल तायडे, मूलचंद चव्हाण, गजानन झ्याटे, रमजान गवरे, प्रशांत घुगे, उमेश तायडे, जगदीश राठोड, ज्ञानेश्वर मुंढे आदींची उपस्थिती हाेती.