दुय्यम निबंधक कार्यालय झाले लेटलतिफ

By Admin | Published: June 12, 2014 09:33 PM2014-06-12T21:33:33+5:302014-06-12T21:35:32+5:30

नियमित वेळेपेक्षा तब्बल अडीचतास उशिरा उघडल्याने दुय्यम निबंधक कार्यालय प्रशासनाच्या कामकाजाबद्दल उपस्थित नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे.

Office of the Sub-Registrar Liechtenstein | दुय्यम निबंधक कार्यालय झाले लेटलतिफ

दुय्यम निबंधक कार्यालय झाले लेटलतिफ

googlenewsNext

रिसोड: येथील दुय्यम निबंधक कार्यालय बुधवार, ११ जून रोजी नियमित वेळेपेक्षा तब्बल अडीचतास उशिरा उघडल्याने दस्तऐवज खरेदी खताकरिता कार्यालयात आलेल्या नागरिकांचे महत्त्वपूर्ण कामांचा खोळंबा झाल्याने दुय्यम निबंधक कार्यालय प्रशासनाच्या कामकाजाबद्दल उपस्थित नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. बुधवारी सकाळी येथील दुय्यम निबंधक कार्यालय साडेबारा वाजेपर्यंत न उघडल्याने कार्यालयीन परिसरात एकच तारांबळ उडाली होती. तालुक्यातील बरेचशे शेतकरी, नागरिक, व्यापारी सकाळी १0 वाजतापासून कार्यालय उघडण्याची वाट बघत होते. कोणतेही शासकीय कार्यालय सकाळी १0 वाजेपर्यंत उघडणे क्रमप्राप्त असते. त्याची जबाबदारी संबंधित कार्यालयप्रमुख असलेल्या अधिकार्‍यावर असते. मात्र बुधवारी या कार्यालयाचे प्रभारी दुय्यम निबंधक पी.ए.राठोड शिपाई हरिदास गवळी हे दोघेही वेळेवर ऑफीस मध्ये हजर न झाल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना तब्बल अडीच तास कार्यालयच्या बाहेर ताटकळत बसावे लागले. साडेबारा वाजताच्या दरम्यान प्रभारी दुय्यम निबंधक राठोड आल्यानंतर ऑफसचे नियमित कामकाज सुरु करण्यात आले. प्रभारी दुय्यम निबंधक हे गत दोन तीन दिवसांपूर्वीच या कार्यालयात रुजु झाल्याचे समजते. ते अकोला येथून अप डाऊन करीत असून या कार्यालयाचा त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आल्याची माहिती आहे. येते. परंतु, बुधवारी या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी न आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खोळबून बसावे लागले. यामध्ये वाडी वाकद येथील कुंडलीक घुगे, भोकरखे, येथील वैजनाथ रंजवे, त्र्यंबक घुगे, दिपक जायभाये, धोडप गंगाराम सुरुशे, विठ्ठल बोरकर, बबन बोरकर, संजय नालेगावकर, आङ्म्रृ नालेगावकर, केवळाबाई नालेगावकर, राम राऊत, औंरगाबाद नारायण घुगे, दत्तराव घुगे, गणेश मुंढे, गजानन उगले, ङ्म्रीराम भिलन आदी नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या प्रशासना बद्दल तीव्र रोष व्यक्त केला.

Web Title: Office of the Sub-Registrar Liechtenstein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.