वाशिम जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांची कार्यालये भाड्याच्या इमारतीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 03:54 PM2018-04-11T15:54:08+5:302018-04-11T15:54:08+5:30

Office of Taluka Agriculture Officers in Washim District In Rental Building! | वाशिम जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांची कार्यालये भाड्याच्या इमारतीत!

वाशिम जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांची कार्यालये भाड्याच्या इमारतीत!

googlenewsNext
ठळक मुद्देवाशिम येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील भाड्याच्या इमारतीत. मंगरूळपीर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय पूर्वी वाढा फार्म येथे चालायचे.रिसोड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचीही अशीच अवस्था असून भाड्याच्या तथा तुलनेने अपुऱ्यां जागेत सर्व कामे उरकावी लागत आहेत.

वाशिम : जिल्ह्यातील सहापैकी तीन तालुक्यांमधील तालुका कृषी अधिकारी कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत. तथापि, तुलनेने कमी प्रमाणातील जागेत कारभार चालविताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून अपेक्षित सोयी-सुविधांचाही अभाव असल्याने यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी पुरते वैतागले आहेत. 
वाशिम येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील भाड्याच्या इमारतीत असून त्याचठिकाणी मंडळ कृषी अधिकारी कार्यालय देखील थाटण्यात आले आहे. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय दुध शितकरण केंद्रासमोरील भाड्याच्या इमारतीत सुरू होते. ते गेल्या दीड महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात हलविण्यात आले. मृद संधारण प्रयोगशाळा जुन्या जिल्हा परिषदेसमोरील एका भाड्याच्या इमारतीत सुरू होणार होती. मात्र, त्यास अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. मंगरूळपीर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय पूर्वी वाढा फार्म येथे चालायचे. शेतकºयांच्या दृष्टीने अत्यंत दूर असलेले हे कार्यालय साधारणत: चार वर्षांपूर्वी शहरातील मध्यवर्ती ठिकाणावर भाड्याच्या इमारतीत हलविण्यात आले. रिसोड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचीही अशीच अवस्था असून भाड्याच्या तथा तुलनेने अपुऱ्यां जागेत तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाºयांना सर्व कामे उरकावी लागत आहेत. एकूणच या सर्व समस्यांमुळे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना विविध स्वरूपातील गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Office of Taluka Agriculture Officers in Washim District In Rental Building!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.