अधिकाऱ्यांनी  घेतला  मंगरुळपीर तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेचा आढावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:11 PM2018-01-25T14:11:48+5:302018-01-25T14:15:12+5:30

मंगरुळपीर :  मंगरुळपीर तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेचा आढावा अधिकाऱ्यांनी   घेतला. 

Officer reviewed the water cup competition in Mangarilpar taluka | अधिकाऱ्यांनी  घेतला  मंगरुळपीर तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेचा आढावा 

अधिकाऱ्यांनी  घेतला  मंगरुळपीर तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेचा आढावा 

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद कापडे यांनी वॉटर कप स्पर्धेच्या आढावा सभेत मार्गदर्शन केले.      सभेला गावातील सरंपच, तलाठी व ग्रामसेवक तसेच कृषी सहायक मोठया संख्येने उपस्थिती होती. 

मंगरुळपीर :  मंगरुळपीर तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेचा आढावा अधिकाऱ्यांनी   घेतला. आपल्या गावात ७०० मीली मिटर पेक्षा जास्त पाउस पडूनही पाणी थांबत नाही. त्यामुळे आपल्याला दुष्काळी समस्येला तोंड द्यावे लागते. दुष्काळी परीस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक गावक-यांना आपल्या श्रमदानतून गावात पाणी मुरले पाहीजे ते टिकाऊ राहते. त्याकरीता पाणी फांउडेशन व शासनाच्या सहकार्याने राबवित असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेेत मंगरूळपीर तालुक्यातील प्रत्येक गावांनी सहभागी व्होउन गावात माझया श्रमदानातून पाणी मुरले पाहीजे ही भावना गावातील प्रत्येक नागरीकांत निर्माण झाली पाहीजे असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद कापडे यांनी वॉटर कप स्पर्धेच्या आढावा सभेत उपस्थित सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करतांना २३ जानेवारी रोजी व्यक्त केले.    

सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या अनुषंगाने आढावा सभेच्या अध्यक्षस्थांनी उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, प्रमुख उपस्थिती म्हणुन तहसिलदार वैशाख वाहुरवाघ, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, पंचायत समिती सभापती निलीमाताई देशमुख, वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. मारूख खान, नंदुभाउ गावंडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पद्माने, पंचायत समिती सदस्ययांची उपस्थिती होती.  यावेळी तहसिलदार वैशाख वाहुरवाघ व वकील संघटनेचे अध्यक्ष मारूख खॉन, नंदु गांवडे, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गावक-यांनी पाच लोकाची निवड कश्या पध्दतीने करावी ही डॉ अविनाश पोळ सरांची फिल्म दाखउन तुफान आलयं या गिताने सांगता करण्यात आली.  सभेला गावातील सरंपच, तलाठी व ग्रामसेवक तसेच कृषी सहायकाचंी मोठया संख्येने उपस्थिती होती. 

Web Title: Officer reviewed the water cup competition in Mangarilpar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.