पाइप खरेदीवरून अधिकारी-पदाधिकारी आमने-सामने !
By admin | Published: May 24, 2017 01:53 AM2017-05-24T01:53:16+5:302017-05-24T01:53:16+5:30
वाशिम : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने केलेल्या स्प्रिंकलर पाइप साहित्य खरेदीचा मुद्दा स्थायी समितीच्या सभेत उपस्थित झाल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने केलेल्या स्प्रिंकलर पाइप साहित्य खरेदीचा मुद्दा स्थायी समितीच्या सभेत उपस्थित झाल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या निमित्ताने अधिकारी व पदाधिकारी आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. समाजकल्याण विभागाने २० टक्के जि.प. सेस अंतर्गत व शेतात एचडीपी पाइप पुरविणे या शीर्षांतर्गत सन २०१४-१५ या सत्रातील स्प्रिंकलर पाइप खरेदीचे कार्यारंभ आदेश असताना, खरेदी करताना अनियमितता केल्याचा मुद्दा जि.प. सदस्याने उपस्थित केला होता. या मुद्यावरून चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले. चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.