अधिकारी, कर्मचाऱ्यांची होणार मौखिक आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 05:31 PM2021-08-02T17:31:51+5:302021-08-02T17:32:13+5:30
Officers, employees will have an oral health check : हिरड्या किंवा दातांमध्ये पायोरिया किंवा हिरड्यांच्या इतर विकारांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.
जागतिक मौखिक स्वच्छता सप्ताह : जनजागृतीवर भर
वाशिम : जागतिक मौखिक स्वच्छता दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात १ ते ७ आॅगस्ट या दरम्यान जनजागृती, मौखिक आरोग्य तपासणी मोहिम राबविली जात असून, या दरम्यान अधिकारी, कर्मचाºयांची मौखिक आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
जागतिक मौखिक स्वच्छता दिन हा १ आॅगस्ट रोजी सर्वत्र पाळला जातो आणि कोरोनाच्या महामारीमध्येही मौखिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे, हेच नव्याने झालेल्या अभ्यास-संशोधनात स्पष्ट झाले आहे. हिरड्या किंवा दातांमध्ये पायोरिया किंवा हिरड्यांच्या इतर विकारांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे मौखिक स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक मौखिक स्वच्छता दिनाचे औचित्य साधून १ ते ७ आॅगस्ट या दरम्यान जनजागृती, मौखिक आरोग्य तपासणीवर सर्वाधिक भर देण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर तसेच इतरांना माहिती देणे, शासकीय व निमशासकीय कार्यालयात जनजागृती करणे, अधिकारी व कर्मचाºयांची मौखिक तपासणी करणे, आरोग्य केंद्रांतील कर्मचाºयांना मौखिक आरोग्यविषयक प्रशिक्षण देणे, मौखिक तपासणी शिबिराचे आयोजन करणे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम आदी ठिकाणी मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांच्या मार्गदर्शनात दंतरोग तज्ज्ञ डॉ. शैलेश वैष्णव, दंतरोग तज्ज्ञ डॉ. मंजूषा वराडे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. रणजित गंडागुळे यांच्यासह कर्मचारी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.