गावोगावी भेटी देवुन पिकनुकसानीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 04:50 PM2019-11-02T16:50:39+5:302019-11-02T16:51:03+5:30
शेतकºयांना दिलासा दिल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: परतीच्या पावसाने धुमाकुळ घालुन हाताशी आलेला शेतकºयांचा घास हिरावून नेल्याने आणी या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शासनाने स्पॉट पंचनामे करुन तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वगार्तुन होत असल्याने प्रशासकीय यंञणा कामाला लागली आहे. शेतकºयांच्या शेतात जावुन पिक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकºयांना दिलासा दिल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे .
वाशिम जिल्ह्यातील शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. सोयाबिनसह अन्य पिकांचेही मोठे नुकसान जिल्ह्यात झाले आहे.हाता तोडांशी आलेला घास हिरावून न्यावा तशीच काहीशी अवस्था या शेतकºयांची झाली आहे. ज्या भागात जमीनीत पाण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणच्या पिकाने केव्हाचीच मान टाकली.मंगरुळपीर तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या शेतात सोयाबिनला कोंब आले. यामुळे तयार झालेले पिक घरापर्यंत पोहचणे मुश्किल झाले आहे.नुकसानीच्या दु:खाचा डोंगर डोक्यावर घेऊन वावरणारा शेतकरी फक्त त्याला झालेल्या नुकसानीची मोठ्या प्रमाणावर भरपाई मिळावी अशी मागणी करीत आहेत. १ नोव्हेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड आणी पारवा येथे स्वत: उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जि.प.उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा कृषी अधिकारी तोटावार, बाजार समितीची संचालक विठ्ठलराव गावंडे, शिवणी रोड येथील सरपंच लल्लुभाऊ गारवे आदींनी शेतकºयांच्या शेतात जावुन पिक नुकसानीची पाहणी केली . एवढेच नाही शेतकºयांच्या घरी जावुन खराब झालेले सोयाबिनचीही पाहणी करुन नुकसान भरपाई जरूर मिळेल असा दिलासा दिल्याने तालुक्यातील शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.प्र्रशासनाने शेतकºयांच्या संवेदना जावुन प्रत्यक्ष भेट घेतल्याने शासनाविषयी विश्वास निर्माण झाला आहे.यावेळी मंडळ अधिकारी चौधरी, पारवा येथील सरपंच गोपाल लुंगे,महंम्मद गारवे, हरिदास पाटील, संजय चव्हाण ,दिपक गावंडे, संतोष गावंडे, विठ्ठल चव्हाण,म् ानोहर चव्हाण ,इमाम गारवे,दिपक सावजी,नंदु चव्हाण यांचेसह शेतकºयांची उपस्थीती होती.