पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचा-यांची झोप उडाली

By admin | Published: October 30, 2014 12:02 AM2014-10-30T00:02:13+5:302014-10-30T00:19:45+5:30

वाशिम बिडीओंना बजावली कारणे दाखवा नोटीस : रिसोड येथे बैठक.

Officials of the Panchayat Samiti lost their sleep | पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचा-यांची झोप उडाली

पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचा-यांची झोप उडाली

Next

वाशिम : दिवाळीच्या सलग सुट्टय़ानंतरही जिल्ह्यातील पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन उपस्थि तीबाबत गंभीर नसल्याचे वास्तव २८ ऑक्टोबर रोजी ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाले होते. ह्यलोकम तह्णच्या स्टिंग ऑपरेशनमुळे दांडीबाज अधिकारी-कर्मचार्‍यांची झोप उडाली असल्याचे चित्र २९ ऑक्टोबर रोजी पाहावयास मिळाले. लोकमतच्या स्टिंगची दखल घेत रिसोडच्या गटविकास अधिकार्‍यांनी दांडीबाज कर्मचार्‍यांची बैठक घेतली तर काही गटविकास अधिकार्‍यांनी ताकिद व कारणे दाखवा नोटीस बजावली. २७ ऑक्टोबरपासून प्रशासकीय कामकाज पूर्ववत झाले; मात्र अधिकारी व कर्मचार्‍यांचा सलग सुट्टय़ांची नशा त्यानं तरही उतरली नसल्याचेच २७ व २८ ऑक्टोबर रोजी लोकमत चमूने केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले होते. जिल्ह्यातील या सहाही पंचायत समितींमध्ये अधिकारी-कर्मचार्‍यांनी दांडी मारल्याचे चित्र ह्यलोकमतह्ण चमूच्या कॅमेर्‍यात कैद झाले हो ते. याबाबत २९ ऑक्टोबरच्या लोकमतह्ण अंकात सचित्र वृत्त प्रकाशित करताच पंचायत समिती प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल म्हणून २९ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सहाही पंचायत समितीमध्ये वेळेवरच अधिकारी-कर्मचार्‍यांनी हजेरी लावली. वाशिमच्या गटविकास अधिकार्‍यांनी रोजगार हमी योजनेचा कक्ष कुलूपबंद प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तर रिसोडच्या गटविकास अधिकार्‍यांनी विभागनिहाय बैठक घेऊन दांडीबाजांचा वर्ग घेतला. कारंजाचे गटशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी, कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांची हलगर्जी खपवून घेणार नाही, दांडीबाजांवर कारवाई करण्यात आली, असे लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Officials of the Panchayat Samiti lost their sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.