शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:26 AM2021-06-27T04:26:39+5:302021-06-27T04:26:39+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशतः टप्पा अनुदानावर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ...
गेल्या अनेक वर्षांपासून १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशतः टप्पा अनुदानावर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी शिक्षण संघर्ष संघटना व जुनी पेन्शन कोअर कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून लढा सुरू आहे. तसेच आतापर्यंत जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना शासनाने अजूनही पेन्शन दिली नाही यासंदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी ५ जून रोजी मुख्यमंत्र्यांना कारंजा तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी शिक्षण संघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष तथा जुनी पेन्शन कोअर कमिटीचे उपाध्यक्ष विजय भड, कारंजा तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम म्हातारमारे, तसेच गजानन लाहे, बी.बी. पपुवाले, गजानन गवाई, राजेश शेंडेकर, गोपाल काकड, अनिल हजारे, कैलास वाघमारे, पी.एम. गुजर, समाधान वर, देवीदास कालबांडे, हरिदास गंदरे, किशोर बोरकर, गोपाल वानखडे,इ. सदस्य उपस्थित होते.