जुने तलाठी कार्यालय बनले धोकादायक

By Admin | Published: July 6, 2014 11:13 PM2014-07-06T23:13:19+5:302014-07-06T23:13:19+5:30

जुन्या तलाठी कार्यालयाची प्रचंड दुरावस्था झाल्याने हे कार्यालय पादचार्‍यांसाठी अतिशय धोकादायक बनले आहे.

Old Talathi office became dangerous | जुने तलाठी कार्यालय बनले धोकादायक

जुने तलाठी कार्यालय बनले धोकादायक

googlenewsNext

शिरपूर जैन : येथील मुख्य रस्त्यावरील (चावडी) तथा जुन्या तलाठी कार्यालयाची प्रचंड दुरावस्था झाल्याने हे कार्यालय पादचार्‍यांसाठी अतिशय धोकादायक बनले आहे. जुन्या काळातील चावडी म्हणून ओळख असलेल्या वास्तूमध्ये दोन वर्षापूर्वीपर्यंत तलाठी कार्यालयाचा कारभार चालत असे. हे कार्यालय आता पूर्णपणे मोडकळीस आले आहे. कार्यालयाची समोरची भिंत जिर्ण होउन बर्‍याच प्रमाणात ढासळली आहे. तसेच त्यावरील टिनपत्रे अस्तविस्त होउन विखुरली आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन ते जानगीर महाराज संस्थानकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर असलेली ही क्षतिग्रस्त चावडी ईमारत पादचार्‍यांसाठी कधीही ढासळून धोकादायक बनली आहे. त्यामुळे ही चावडी ईमारत तात्काळ पूर्णपणे जमीनदोस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्राप्त माहिती प्रमाणे स्व. आ. सुभाषराव झनक यांनी ही ईमारत पाडून ईमारत बांधकामासाठी ८ लाखाचा निधीसुद्धा एका वर्षापूर्वीच मंजूर केलेला आहे. तरी सुद्धा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नविन ईमारत बांधकाम अद्यापही सुरुवात करण्यात आले नाही. त्यामुळे सुरुवातीला चावडी ईमारतीतून चालणार्‍या तलाठय़ांचा काभार दोन वर्षापासून खाजगी भाड्यांच्या जागेमधून सुरु आहे. या खाजगी जागेचे भाडेसुद्धा तलाठय़ांना स्वत:च्या खिशातून द्यावे लागत आहे. त्यामुळे तलाठय़ांसह गावातील नागरिकांमध्ये ही धोकादायक चावडी इमारतीमुळे भिती व्यक्त रोष निर्माण झाला आहे.

Web Title: Old Talathi office became dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.