रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वृद्धेचा मृत्यू

By admin | Published: December 12, 2014 12:37 AM2014-12-12T00:37:56+5:302014-12-12T00:37:56+5:30

सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार; कायदेशीर कारवाईची मागणी

Older death due to potholes on the road | रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वृद्धेचा मृत्यू

रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वृद्धेचा मृत्यू

Next

किनखेडा (वाशिम ) : रिसोड मालेगाव या प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डय़ाने अखेर शेलगाव राजगुरे येथील एका वृद्धेचा बळी ७ डिसेंबर रोजी घेतला. खड्डय़ांमुळे वृद्धेचा मृत्यू झाला. ९ डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली अन् खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले.
केशवनगर ते किनखेडा मार्ग अतिशय खराब झाला असून, याबाबत संबंधित गावकर्‍यांनी सा.बां. विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या; मात्र रस्ता दुरुस्ती झाली नाही. मे २0१४ मध्ये किनखेडा ग्रा.पं.ने प्रवाश्याच्या सुखमय प्रवासासाठी खड्डय़ांमध्ये होमहवनाचा कार्यक्रमही केला. या आंदोलनाचे फलित झाले व रस्ता कामाची दुरूस्ती करण्यात आली. दुरूस्ती थातुरमातुर केल्याने पुन्हा मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले व या खड्डय़ांमुळे शेलगाव राजगुरे येथील बायडाबाई अंबादास वाघ ही महिला मृत्यू पावली. यासंदर्भात भारतीय मानवाधिकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अनंत देशमुख यांनी या अपघातास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली.

Web Title: Older death due to potholes on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.