बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाशिमात जल्लोष, रॅली! अनुयायांची गर्दी

By संतोष वानखडे | Published: April 14, 2024 05:47 PM2024-04-14T17:47:56+5:302024-04-14T17:48:26+5:30

सार्वजनिक भीमजयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी कार्यक्रमाला सकाळी ६ वाजतापासूनच हजारो अनुयायांनी हजेरी लावली.

On the occasion of Babasaheb Ambedkar's birth anniversary, rally in Washim Crowds of followers | बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाशिमात जल्लोष, रॅली! अनुयायांची गर्दी

बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाशिमात जल्लोष, रॅली! अनुयायांची गर्दी

संतोष वानखडे

वाशिम : भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत हजारो अनुयायांनी महामानवाला मानवंदना दिली. रॅली, मिरवणुकीतून 'एकच साहेब... बाबासाहेब 'चा जयघोष निनादला.

सार्वजनिक भीमजयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी कार्यक्रमाला सकाळी ६ वाजतापासूनच हजारो अनुयायांनी हजेरी लावली. शहराच्या कानाकोपऱ्यातून  जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक, अर्धसैनिक दलातील सर्व सैनिकांच्यावतीने महामानवाला मानवंदना (सलामी ) दिली. सकाळी ९:३० वाजता सामुहिक बुद्धवंदना घेत त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आले. 

यावेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपाळराव आटोटे गुरुजी, ज्येष्ठ नेते रामप्रभू सोनोने, ज्येष्ठ नेते मधूकरराव जुमडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष विनोद पट्टेबहादूर, उपाध्यक्ष गोवर्धन राऊत, सचिव शेषराव धांडे व कोषाध्यक्ष हेमंत तायडे, पिरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, रिपाइंचे (आ. गट) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे, प्रतिभाताई सोनोने, डॉ. अलका मकासरे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, उपासक, उपासिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. शहरातील नालंदा नगर , आययुडीपी काॅलनी, पंचशिल नगर , समता नगर, श्रावस्ती नगर, भिम नगर, लाखाळा, अल्लाडा प्लॉट, रमाई नगर, आनंदवाडी यांसह अन्य नगरांमध्ये सामुहिक बुद्धवंदना घेऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकींचा समारोप डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आली. ढोल-ताशाच्या तालावर तरूणाईने मोठा जल्लोष केला.
 

Web Title: On the occasion of Babasaheb Ambedkar's birth anniversary, rally in Washim Crowds of followers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.