पसरणीचे उपसरपंच हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक
By admin | Published: May 18, 2017 02:35 PM2017-05-18T14:35:30+5:302017-05-18T14:35:30+5:30
या इसमाला रात्री १ वाजताच्या दरम्यान अटक करून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
कारंजा लाड - कारंजा तालुक्यातील ग्राम पसरणी येथील ग्राम पंचायतचे उपसरपंच विलास पोटपिटे याची दादगाव शेतशिवारात ५ एप्रिल रोजी हत्या झाली होती. हत्या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास मोहीम जोरात सुरू केली असून पोटपिटे यांच्या सोबत संबध असणा-या सर्व संबधिताची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच आरोपी पोलीसांच्या ताब्यात येईल असा विश्वास पोलीसांनी दाखविला. हत्या प्रकरणी कारंजा पोलीसांनी पसरणी येथील महेबुब मदन चौधरी वय ३२ या इसमाला दि. १७ मे च्या रात्री १ वाजताच्या दरम्यान अटक करून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या अटकेमुळे आणखी तिन ते चार आरोपी अटक होण्याची शक्यता पोलीसाकडून वर्तविण्यात येत आहे. पसरणी येथील उपसरपंच विलास मारोती पोटपिटे वय ३८ हे विहिरचे बांधकाम करण्याचा व्यवसाय करीत होते. ५ एप्रिल रोजी त्याच कामानिमित्त सांयकाळी ५ वाजता निघून गेले. दरम्यान पोटपिटे यांचा मृतदेह ५ एप्रिल रोजी दादगाव शेतशिवारात असल्याची माहीती दादगाव येथील पोलीस पाटील यांनी ठाणेदार राजेंद्र पाटील यांना दिली. यावेळी पोलीस कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. दादगाव रोडवर एम.उच ३७ एम ८५९० या क्रमांकाची पॅशनप्रो ही मयताची दुचाकी उभी असल्याचे दिसून आले तर मयत पोटपिटे याचा मृतदेह गळयात दुपटटा बांधलेल्या अवस्थेत रोड पासून काही अंतरावर असलेल्या बाभूळवनात आढळयाने घातपात झाल्याचे निश्पन्न झाले. त्यावरून पोलीसांनी अज्ञात आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून तापास मोहीम सुरू केली असून १३ दिवसात तपासणीला वेग असून उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले हे तपासाची भूमिका पार पाडत असून यांनी महेबूब मदन चौधरी वय ३२ रा पसरणी याला १८ मे च्या रात्री १ वाजता अटक केली .या अटकेमुळे काही आरोपी सुद्धा आज अटक होण्याची शक्यता आहे तपासाकरिता भगवान पायघन व पोलीस कर्मचारी करीत आहे.