दीड लाखावरील भरलेली रक्कम शासन करणार परत : आमदार पाटणी यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 04:19 PM2018-08-11T16:19:18+5:302018-08-11T16:21:24+5:30
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कुटुंबाच्या एकुण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड लाभासाठी भरलेली दीड लाखवरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कुटुंबाच्या एकुण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड लाभासाठी भरलेली दीड लाखवरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे. १० आॅगष्ट २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
योजनेच्या प्रचलित निकषानुसार कुटुंबाच्या सर्व कर्जदार सदस्यांच्या पात्र कर्जखात्यांची एकुण थकबाकी दीड लाखापेक्षा जास्त आहे , अशा अर्जदार कुटुंबातील पात्र सदस्यांनी दीड लाखावरील रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यास त्यांना शासनाच्यावतीने प्रती कुटुंब दीड लाख मयार्देपर्यंत लाभ देण्यात येत होता. सोबतच्या शासन निर्णयान्वये सुधारित बदलानुसार कर्जमाफीबाबतच्या इतर निकषास अधिन राहुन यापुर्वीच्या प्रती कुटुंब दीड लाखापर्यंत कर्जमाफीच्या लाभाऐवजी यापुढे अर्जदार कुटुंबातील प्रत्येक पात्र कर्जदार सदस्यास दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. सदर बदलामुळे यापुर्वी लाभार्थ्यांच्या याद्या निश्चित करतांना करण्यात आलेल्या लाभाच्या गणनेत बदल करण्यात येऊन कुटुंबातील प्रत्येक पात्र सदस्यांच्या वैयक्तिक कर्जखात्यांच्या थकबाकीची पुनर्गणना करण्यात येणार आहे. प्रत्येक सदस्यांस दीड लाखापर्यंंत कर्जमाफी, एकरकमी कर्जपरत फेड योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पुनर्गणनेव्दारे लाभाचे निश्चितीकरण केल्यानंतर कुटुंबातील वैयक्तीक कर्जदार सदस्यांची पात्र थकबादीची रक्कम दीड लाखापेक्षा कमी असल्यास अशा परिस्थितीत योजनेच्या यापुर्वीच्या निकषानुसार कुटुंबाच्या एकुण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड योजनेच्या लाभासाठी भरलेली दीड लाखावरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येईल. तसेच बदललेल्या निकषानुसार कर्जदार वैयक्तीक सदस्यांची थकबाकीची रक्कम दीड लाखाच्या आत असल्यास आणि लागु असेल तेथे अशा सदस्यांकडील पुनर्गठीत कर्जाची उर्वरित हप्त्यांच्या देय असलेल्या रकमेसह दीड लाख या मयार्देपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची माहितीही आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली.