अमाना येथे एक जण कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:09 AM2021-01-08T06:09:39+5:302021-01-08T06:09:39+5:30
००००००० आधारअभावी कर्जमाफी रखडली किन्हीराजा : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजासह अनेक शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग व अन्य प्रशासकीय सोपस्कार पूर्ण न ...
०००००००
आधारअभावी कर्जमाफी रखडली
किन्हीराजा : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजासह अनेक शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग व अन्य प्रशासकीय सोपस्कार पूर्ण न झाल्याने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला नाही. कोरोनामुळे आधार नोंदणी केंद्रही प्रभावित झाले.
०००००
पिंपळशेंडा येथे मोफत तपासणी शिबिर
मेडशी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत महिला उत्कर्ष प्रतिष्ठान रिसोडद्वारा संचालित फिरते वैद्यकीय पथकाद्वारे येथून जवळच असलेल्या पिंपळशेंडा येथे गरोदर माता, स्तनदा माता, बालक व इतर रुग्णांची मोफत तपासणी व औषध वितरण शिबिर १५ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.
००
तलाठी, शिक्षकांची १२ पदे रिक्त
शिरपूर : शिरपूर जिल्हा परिषद गटातील तलाठ्यांची तीन तर शिक्षकांची जवळपास नऊ अशी एकूण १२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली. परंतु, नोकरभरती बंद असल्याचे सांगण्यात येते.