प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी एक दिवसाची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:22 AM2017-08-05T01:22:10+5:302017-08-05T01:23:05+5:30
वाशिम: खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकर्यांना पुन्हा एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असून, आता ५ ऑगस्ट २0१७ रोजी सायंकाळी ५ वाजेपयर्ंत या योजनेत शेतकर्यांना सहभागी होता येईल. जिल्ह्यातील सर्व बिगर कर्जदार शेतकर्यांनी आजच नजिकच्या जनसुविधा केंद्रात जाऊन आपला विमा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी बिगर कर्जदार शेतकर्यांना ५ ऑगस्ट २0१७ रोजी सायंकाळी ५ वाजेपयर्ंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत केवळ जनसुविधा केंद्रांवरच विमा प्रस्ताव सादर करता येतील. ज्या शेतकर्यांनी सन २0१७-१८ करिता खरीप पीक कर्ज घेतलेले नाही, तसेच यापूर्वी घेतलेले कर्ज थकीत आहे, असे सर्व शेतकरी वाढीव मुदतीत पीक विमा प्रस्ताव सादर करण्यास पात्र आहेत. पावसाने उघडीप दिल्याने बिकट बनलेल्या परिस्थितीत या योजनेचा शेतकर्यांना फायदा होऊ शकतो. या काळात पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळेल.