अनसिंगमध्ये तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 07:23 PM2019-01-15T19:23:01+5:302019-01-15T19:23:14+5:30

अनसिंग (वाशिम) : येथील प.दि. जैन शाळेतील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत होवून एका ५२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवार, १५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास प.दि. जैन शाळा ते पोलिस स्टेशनदरम्यान घडली.

One killed in quarel between two groups | अनसिंगमध्ये तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू!

अनसिंगमध्ये तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू!

Next

क्षुल्लक कारणावरून वाद : पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग (वाशिम) : येथील प.दि. जैन शाळेतील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत होवून एका ५२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवार, १५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास प.दि. जैन शाळा ते पोलिस स्टेशनदरम्यान घडली.
मृतकाचा भाऊ राहुल केशव काळे (वय ३५ वर्षे) यांनी अनसिंग पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात माझा मुलगा विक्रमादित्य राहुल काळे याचा कार्यक्रम बघायला मी व माझा भाऊ संजय केशव काळे मंगळवार, १५ जानेवारीला दुपारी दीड वाजताच्या सुमारास गेलो. कार्यक्रम सुरू असताना त्याठिकाणी आलेल्या सागर सुरेश गव्हाणे हा माझ्याकडे रागाने पाहत होता. त्याबद्दल त्यास जाब विचारला असता, त्याने शिविगाळ करून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. हा वाद त्याठिकाणी संपला होता. मात्र, शाळेतून घरी जात असताना सागर गव्हाणे याच्या चहाच्या दुकानानजिक श्याम गव्हाणे, अजय गव्हाणे, अंकुश सोनुनेचा मुलगा, अक्षय आमरावतकर, रामा गव्हाणे, श्यामा शिंदे, गजानन गव्हाणे, गणेश राऊत, गणेश आमरावतकर व अन्य काही लोकांनी आम्हाला अडवून सागर गव्हाणे याने चहाच्या टपरीत ठेवून असलेला लोखंडी रॉड आणून माझ्या डोक्यावर मारून जखमी केले व इतरांनी लाथा-बुक्यांनी मारहाण केली. त्याठिकाणहून आम्ही पोलिस स्टेशनकडे तक्रार दाखल करायला जात असताना आमच्या मागून सागर गव्हाणे हा पळत आला व त्याने दगड घेवून तो माझा भाऊ संजय काळे याच्या डोक्यात घातला. यात भाऊ जबर जखमी झाला. त्यास माझे काका रमेश काळे, चुलत भाऊ नीलेश काळे, गजानन गवळी यांच्या मदतीने सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. यादरम्यान आरोपींनी आमच्या घरावरही दगडफेक करून दुचाकी वाहनासह अन्य साहित्याचे नुकसान केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून अनसिंग पोलिसांनी नमूद सर्व आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ३२४, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ४५२, २९४, ४२७, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर हत्येचा गुन्हा मात्र दाखल झालेला नव्हता.
 
संजय काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू!
संजय केशव काळे यांच्यावर अनसिंगच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून त्यांना वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हरण यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: One killed in quarel between two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.