ट्रक अपघातात एक ठार, तीन जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 03:00 PM2018-12-19T15:00:58+5:302018-12-19T15:01:35+5:30
कारंजा लाड (वाशिम) : कांदे घेऊन जाणाºया ट्रकने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील जुडवा हनुमान मंदिराजवळील कोल फॅक्टरीसमोर १८ डिसेंबरच्या रात्री १ वाजतादरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : कांदे घेऊन जाणाºया ट्रकने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील जुडवा हनुमान मंदिराजवळील कोल फॅक्टरीसमोर १८ डिसेंबरच्या रात्री १ वाजतादरम्यान घडली. जुबेर पठाण असे मृतकाचे नाव आहे.
एमएच २२ एए १४३३ क्रमांकाचा ट्रक औरंगाबादवरून नागपूरकडे कांदे घेऊन जात असताना कारंजा ते मूर्तिजापूर मार्गावरील कोल फॅक्टरीसमोर असलेल्या एका झाडाला धडकला. घटनेची माहिती मिळताच सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई यांनी रात्री २ वाजताच्या सुमरास चमूसह घटनास्थळ गाठले. यावेळी चालक जुबेर पठाण हा मृतावस्थेत आढळून आला तर ट्रकमधील विशाल चौबे, इमरान पठान या जखमींना उपचारार्थ कारंजा ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्यानंतर ट्रकमध्ये अडकलेले सुभाष चौबे या शेतकºया वाचविण्यासाठी प्रयत्न केले. कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी क्रेनचे नियोजन केले. विठ्ठल अवताडे यांनी स्वत: क्रेन आणून सुभाष चौबे या शेतकरीला वाचाविण्यात यश मिळविले. ट्रकमधून बाहेर काढताना चौबे यांना एक पाय गमवाला लागला. ‘सास’च्या चमूने नातेवाईकांशी संपर्क करून जखमीना अकोला व औरंगाबाद येथे उपचारार्थ रवाना केले.
जखमींना तातडीने उपचारासाठी पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, पोलीस कर्मचारी व सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई, चालक सुमेद बागडे, अजय घोडेस्वार यांच्यासह मार्तिजापूर व पिंजरच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे डॉ.मंगलदास पाटील, पायलट भिमराव खाडे व श्री गुरुदेव सेवाश्रम समितीच्या रुग्णवाहिकेची मदत मिळाली.