दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार

By admin | Published: September 8, 2015 02:12 AM2015-09-08T02:12:28+5:302015-09-08T02:12:28+5:30

कारंजा तालुक्यातीलच शेवती फाट्याजवळ ट्रकने स्कॉर्पिओ गाडीला धडक दिल्याने चार जण गंभीर.

One killed in two different accidents | दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार

दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार

Next

कारंजा लाड : अपघातांच्या दोन वेगवेगळ्या घटनांत एक जण ठार तर सहा जण जखमी झाले. यामध्ये रविवारी (दि.६) मध्यरात्री नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर दोन ट्रकच्या धडकेत एक ठार झाला, तर कारंजा तालुक्यातीलच शेवती फाट्याजवळ ट्रकने स्कॉर्पिओ गाडीला धडक दिल्याने चार जण गंभीर जखमी झाले. विनोदसिंग (रा. बिहार) असे मृतकाचे नाव आहे. कारंजा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक अजिमखान खलील खान (२८) रा.बाजोरिया नगर, यवतमाळ यांनी फिर्यादीत नमूद केले की, ट्रक ओडी-१५, बी-३२८८ क्रमांकाच्या ट्रकवरील क्लिनरने आपल्या ताब्यातील सदर वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून पुढे जात असलेल्या एमएच ४0 एन-५६0२ क्रमांकाच्या ट्रकला मागील बाजूने धडक दिली. या अपघातात तो स्वत: जखमी होऊन चालक विनोदसिंग रा. बिहार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. ही घटना रविवारी रात्री ११.४0 वाजताच्या सुमारास नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील अंकुश धाब्याजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी ओडी- १५ बी-३२८८ क्रमांकाच्या ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास जमादार सुभाष सोनोने करीत आहेत. दुसरी फिर्याद विनोद महादेवराव शिंदे (२७) रा.शहापूरनगर बायपास रोड मंगरुळपीर यांनी दाखल केली. एमएपी २0 एचबी ५४६६ क्रमांकाच्या ट्रकच्या चालकाने आपला ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून ओव्हरटेक करताना फिर्यादीच्या एमएच ३७ जी-६३८८ क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीला जबर धडक दिली. त्यामुळे या घटनेत स्कॉर्पिओ चालक प्रदीप किसन वाडे, विजय वर्मा, प्रज्वल ठाकरे, कैलास वाकपांजर जखमी झाले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. ही घटना रविवारी रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील शेवती फाटा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक (एमएपी २0 एचबी ५४६६) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: One killed in two different accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.