पोलीस असल्याची बतावणी करून एका लाखाने फसविले
By संतोष वानखडे | Published: October 2, 2022 05:56 PM2022-10-02T17:56:16+5:302022-10-02T17:56:26+5:30
पोलीस असल्याची बतावणी करून अज्ञात चोरट्यांनी एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे जवळपास १ लाख रूपयाचे सोन्याचे दागिणे लंपास केल्याची घटना २
वाशिम:
पोलीस असल्याची बतावणी करून अज्ञात चोरट्यांनी एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे जवळपास १ लाख रूपयाचे सोन्याचे दागिणे लंपास केल्याची घटना २ आॅक्टोबरला सकाळी १० वाजताच्या दरम्यान कारंजा शहरातील पोहा वेशीजवळील स्वामी विवेकानंद हायस्कुल समोर घडली. यापुर्वी १५ सप्टेंबरलादेखील टिळक चैाकात अशीच घटना घडल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कारंजा शहरातील बायपास परिसरातील एका वाईनबारच्या मागे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त कर्मचारी शंकरराव चवरे (६०) हे कारंजा शहराकडे येत होते. दरम्यान, पोहा वेशीजवळील स्वामी विवेकानंद हायस्कुल समेार दोन जणांनी चवरे यांची दुचाकी थांबवुन पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखविले. सोन्याचे दागिने घालुन शहरात फिरू नका असे सांगत त्यांच्याकडील सोन्याची साखळी व अंगठी एका कागदाच्या पुडीत बांधली व ती पुडी त्यांच्याकडे दिली. काही वेळाने त्यांनी पाहिले असता त्यात सोन्याची साखळी व अंगठी दिसुन न आल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात आले. वेळ न दडवता त्यांनी थेट शहर पोलिस स्टेशन गाठले. दरम्यान, मागील १५ सप्टेंबरला देवदर्शनासाठी मंदिरात जात असताना कारंजा येथिल माजी नगराध्यक्ष यांच्या पत्नी दिनाबाइ अरविंद लाठीया यांची सुध्दा अश्याच प्रकारे तोतया पेालिसांनी फसवणुक करून सोन्याचे दागिने लंपास केले हेाते.