'खेलो इंडिया'मध्ये निवडीसाठी एक लाख मागितल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 03:33 PM2018-12-03T15:33:59+5:302018-12-03T15:34:10+5:30
मालेगाव (वाशिम): केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘खेलो इंडिया’ या युवा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत राज्य कबड्डी संघात निवडीसाठी निवड समितीत मार्गदर्शक असलेल्या सदस्याने खेळाडू निवडीसाठी दोघांकडे एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप समितीतील सदस्य राजीव आढाव यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘खेलो इंडिया’ या युवा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत राज्य कबड्डी संघात निवडीसाठी निवड समितीत मार्गदर्शक असलेल्या सदस्याने खेळाडू निवडीसाठी दोघांकडे एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप समितीतील सदस्य राजीव आढाव यांनी केला आहे. याबाबत त्यांनी शिक्षण मंत्रालयासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
क्रीडा व युवक संचालनालय शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे यांच्यावतीने २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीत निवड करण्यासाठी काही सदस्य घेण्यात आले. त्यामध्ये गीता साखरे पुणे, किशोर बोंडे वाशिम, विदर्भ कबड्डी असोशिएशनचे राजू आढाव वाशिम. विजय खोकले गडचिरोली, संघटनेचे प्रतिनिधी हिराचंद पाटील यांची निवड शासनाच्यावतीने करण्यात आली होती. निवड समिती सदस्य राजू आढाव यांनी केलेल्या तक्रारीनुसार २० नोव्हेंबरला राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली. यात विदभार्तील सहा खेळाडूंचा सहभाग होता. निवड समिती मार्फत घेण्यात आलेल्या चाचणीत राज्यातून विविध ठिकाणाहून आलेल्या खेळाडूंप्रमाणे विदर्भातील खेळाडूंचाही उत्कृष्ट सहभाग होता. मात्र समितीतील एका सदस्याने विदर्भातील दोन खेळाडूंचे नाव राष्ट्रीय कबड्डी संघात समावेश करून त्यांच्या निवडीसाठी एकूण खर्च तसेच कार्यालयीन कर्मचारी सांभाळण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये पालकांकडून मागून आम्हाला द्यावेत, असे सुचवल्याचा आरोप आढाव यांनी तक्रारीत केला असून, तीन सदस्यांनी नियमात बसत नसतानाही जास्त वजन गटाच्या खेळाडूंना खेळण्याची मुभा दिली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवाय समितीतील सदस्य हे आपण सुचविलेल्या कोणत्याही मताचा आदर करत नाहीत. त्यामुळे विदर्भातील सर्व खेळाडूंवर वारंवार अन्याय होतोत्यामुळे या समितीतील अन्य सदस्यांची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करून विदर्भातील खेळाडूंना न्याय द्यावा. अशी मागणी त्यांनी केली आहे.