जिल्ह्यात नव्याने एकाचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:44 AM2021-09-18T04:44:52+5:302021-09-18T04:44:52+5:30

वाशिम : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाने बाधित एकही रुग्ण आढळला नाही; तर १७ सप्टेंबरला प्राप्त अहवालानुसार नव्याने एकाचा ...

One of the new corona reports in the district is positive | जिल्ह्यात नव्याने एकाचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात नव्याने एकाचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह

Next

वाशिम : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाने बाधित एकही रुग्ण आढळला नाही; तर १७ सप्टेंबरला प्राप्त अहवालानुसार नव्याने एकाचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यापूर्वी उपचार घेत असलेल्या सातजणांपैकी दोघांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून, आता पाच रुग्ण ‘ॲक्टिव्ह’ असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले.

जिल्ह्यात साधारणत: मार्च २०२१ नंतर आलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता जून महिन्यापर्यंत कायम राहिली; मात्र त्यानंतर सातत्याने बाधितांच्या संख्येत विक्रमी घट व्हायला लागली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून, तर दैनंदिन एक किंवा दोनच बाधित आढळत आहेत. विशेष बाब म्हणजे १४ ते १६ या तीन दिवसांत एकाचाही अहवाल पाॅझिटिव्ह आला नाही. १७ सप्टेंबरला मात्र कारंजा तालुक्यातील जानोरा येथे वास्तव्यास असलेला एकजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी दोघांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आता पाचजणांवर उपचार सुरू आहेत.

........................

कोरोना बाधितांची सद्य:स्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ४१७३६

ऍक्टिव्ह – ५

डिस्चार्ज – ४१०९२

मृत्यू - ६३८

Web Title: One of the new corona reports in the district is positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.