ऑटो उलटल्याने एक ठार, एक गंभीर जखमी; पिंपळगाव निपाणी फाट्याजवळील घटना
By दादाराव गायकवाड | Updated: October 27, 2022 17:37 IST2022-10-27T17:37:14+5:302022-10-27T17:37:26+5:30
ऑटो पलटी झाल्याच्या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

ऑटो उलटल्याने एक ठार, एक गंभीर जखमी; पिंपळगाव निपाणी फाट्याजवळील घटना
वाशिम : भाजीपाला घेऊन जाणारा ऑटो रस्त्याच्या कडेला उलटून घडलेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यु झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर पिंपळगाव निपाणी फाट्यानजिक घडली. हर्षद लांडकर (वय १७ वर्ष) असे या अपघातातमृत्यू पावलेल्या युवकाचे, तर आकाश भालेराव (वय १९ वर्ष) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. मंगरुळपीर तालुक्यातील मोझरी येथील हर्षद लांडकर व आकाश भालेराव हे दोघे ऑटोने भाजीपाला घेऊन नेर येथे विक्रीसाठी जात होते.
या मार्गावर पिंपळगाव निपाणी फाट्यानजिक ऑटो चालकाला डुलकी आल्याने अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच १०८ रूग्णवाहिका दाखल झाली व जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात आणले. परंतु तपासणी दरम्यान, एकाला मृत घोषीत करण्यात आले. तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बाहेर गावी पाठविण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"