वाशिममार्गे हैदराबाद-भगत की कोठी एक्स्प्रेसची एक फेरी
By दिनेश पठाडे | Published: November 19, 2023 08:29 PM2023-11-19T20:29:54+5:302023-11-19T20:30:05+5:30
तेलंगाणातून राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने हैदराबाद ते भगत की कोठी या विशेष एक्स्प्रेसची एक फेरी करण्याचा निर्णय १९ नोव्हेंबर रोजी घेतला.
वाशिम : तेलंगाणातून राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने हैदराबाद ते भगत की कोठी या विशेष एक्स्प्रेसची एक फेरी करण्याचा निर्णय १९ नोव्हेंबर रोजी घेतला.
गाडी क्रमांक ०७०२१ हैदराबाद-भगती की कोठी हैदराबाद येथून बुधवार, २२ नोव्हेंबरला रात्री २१:०५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री ८ वाजता भगत की कोठी येथे पोहचेल. या विशेष रेल्वेगाडीला सिकंदराबाद, मेडचाळ, वाडियाराम, कामारेड्डी, निजामाबाद, बसरा, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, सुरत, वडोदरा, गेरतपूर, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, अबू रोड, पिंडवारा, फलना, मारवाड, पालीमारवार आणि लुनी जंक्शन येथे थांबा असणार आहे. ट्रेनमध्ये एसी, स्लीपर आणि द्वितीय श्रेणीचे कोच असणार आहेत.