गटविकास अधिका-याने मागितली एक हजाराची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 07:35 PM2017-09-25T19:35:53+5:302017-09-25T19:36:20+5:30
वाशिम : मालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय नामदेवराव महागांवकर यांनी विहीरीच्या खोदकामाच्या बिलाचा धनादेश जमा करण्यासाठी तक्रारदाराला एक हजाराची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक आनंद रूईकर यांच्या पथकाने महागावकर यांना अटक केली. ही घटना सोमवारला दुपारी ३ वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क

प्राप्त माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत तक्रारदार यांचे वडीलांचे नावे झालेल्या विहीरीचे खोदकामाच्या पहिल्या बिलाचे ७१ हजार रूपयाचा धनादेश खात्यामध्ये जमा करण्यासाठी गटविकास अधिकारी महागावकर याने २९ आॅगस्ट रोजी एक हजाराची लाच मागितली होती. अशी तक्रार १३ सप्टेंबर रोजी वाशिम येथील ए.सी.बी. कार्यालयात दिली. या तक्रारीवरून १४ सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता गटविकास अधिकारी महागांवकर यांनी पडताळणी दरम्यान १ हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून १८ सप्टेंबर व २२ सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला असता गर्दी वाढल्यामुळे तक्रारदारावर संशय आला त्यामुळे गटविकास अधिकाºयाने लाचेची रक्कम स्विकारली नाही.
१४ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गटविकास अधिकारी महागांवकर यांना सोमवारला ताब्यात घेऊन त्यांचे विरूध्द कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.