दिल्ली येथील धार्मिक संमेलनात वाशिम जिल्ह्यातील एकाचा सहभाग असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 06:06 PM2020-04-01T18:06:17+5:302020-04-01T18:09:33+5:30

संशयितास विलगिकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

one of Washim district's Suspected to be involved in religious gatherings in Delhi | दिल्ली येथील धार्मिक संमेलनात वाशिम जिल्ह्यातील एकाचा सहभाग असल्याचा संशय

दिल्ली येथील धार्मिक संमेलनात वाशिम जिल्ह्यातील एकाचा सहभाग असल्याचा संशय

Next
ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक जण गेल्याचा प्रशासनाला संशय आहे.संशयितास विचारणा केली असता, आपण गेलो नसल्याचे तो इसम सांगत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका धार्मिक संमेलनात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक जण सहभागी झाल्याचा संशय जिल्हा प्रशासनाने १ एप्रिल रोजी वर्तविला असून, त्यादृष्टिने पुढील कार्यवाही केली जात आहे.
दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत एक धार्मिक संमेलन झाले होते. या संमेलनात दोन हजारांपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. या संमेलनात महाराष्ट्रातील १०९ भाविकांचा सहभाग होता. दरम्यान वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक जण गेल्याचा प्रशासनाला संशय आहे. संशयितास विचारणा केली असता, आपण गेलो नसल्याचे तो इसम सांगत आहे. संशयितास विलगिकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

Web Title: one of Washim district's Suspected to be involved in religious gatherings in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.