भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेस एक वर्ष मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 05:47 PM2018-12-29T17:47:15+5:302018-12-29T17:47:33+5:30
वाशिम : भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना या योजनेंतर्गंत २०१८-१९ या एका वर्षाकरिता फळबाग लागवडीस ३१ मार्च २०१९ पर्यंत कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभागाच्यावतिने २८ डिसेंबरच्या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात आली आहे.

२०१८-१९ च्या खरिप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड ही नविन योजना राज्यात लागू करण्यात आली आहे.या योजनेंतर्गंत फळबाग लागवडीचा कालावधी प्रतिवर्ष माहे मे ते नोव्हेंबरपर्यंत आहे. यावर्षी दुष्काळसदृष परिस्थीती असल्यामुळे तसेच योजनेच्या अंमलबजावणीस विलंब झाल्याने विहित कालावधीत फळबाग लागवड करणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे सदर योजनेंतर्गंत फळबाग लागवडीच्या कालावधीस मुदतवाढ देण्याची विनंती कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या योजनेस एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेला शासनाकडून वर्षभराची मुदतवाढ मिळाली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांनी या संधीचा लाभ घ्यावा, म्हणून प्रयत्न करण्यात येतील.
-शितल नांगरे, कृषी अधिकारी, मंगरुळपीर (शासकीय रोपवाटिका)