विनयभंगप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा सo्रम  कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:24 AM2017-09-09T01:24:33+5:302017-09-09T01:24:33+5:30

वाशिम: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी  दोषी आढळून आलेल्या आकाश ओंकार सावंत या  आरोपीस एक वर्षाच्या सo्रम कारावासाची तसेच १0  हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व  सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश के.के. गौर  यांनी शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सुनावली.

One year's imprisonment for molestation | विनयभंगप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा सo्रम  कारावास

विनयभंगप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा सo्रम  कारावास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी  दोषी आढळून आलेल्या आकाश ओंकार सावंत या  आरोपीस एक वर्षाच्या सo्रम कारावासाची तसेच १0  हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व  सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश के.के. गौर  यांनी शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सुनावली.
स्थानिक पॉलिटेक्निक कॉलेजसमोर २९ ऑक्टोबर  २0१५ रोजी सकाळी ९.३0 ते १0 वाजताच्या  सुमारास सदर घटना घडली होती. अल्पवयीन  असलेल्या पीडित बालिकेने स्वत: सदर घटनेची  फिर्याद वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली होती.  आपल्या फिर्यादीत पीडितेने नमूद केले होते की,  पॉलिटेक्निक कॉलेजसमोरील एका कोचिंग  क्लासेसला शिकवणीसाठी सकाळच्या सुमारास  मोठय़ा बहिणीने पोहोचवून दिले होते. शिकवणी  सं पल्यानंतर क्लासच्या बाहेर वडिलांची वाट पाहत उभी  असताना आकाश सावंत रा. निमजगा हा दुचाकीने  माझ्या जवळ येऊन वाईट उद्देशाने माझे हात धरून  विनयभंग केला. सदर फिर्यादीवरून आरोपी आकाश  याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ अ व ३५४ ड तसेच  कलम ११ व १२ बाल  लैंगिक कायद्यान्वये गुन्हा दा खल केला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक  योगेश धोत्रे यांनी तपास पूर्ण करून प्रकरण  न्याय प्रविष्ट केले होते. विद्यमान न्यायालयाने सात साक्षीदार  तपासले. साक्षी पुराव्यावरून आकाश सावंत हा दोषी  आढळून आल्यामुळे न्यायालयाने त्यास कलम ३५४  ‘अ’ मध्ये एक वर्षे सo्रम कारावासाची शिक्षा  सुनावनी तसेच दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास  पुन्हा तीन महिने सo्रम कारावास अशी शिक्षा  ठोठावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक  सरकारी वकील अँड.एस.के. गिमेकर यांनी बाजू  मांडली. 

Web Title: One year's imprisonment for molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.