कांदा, लसणाचे दर नीचांकी पातळीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:25+5:302021-02-23T05:01:25+5:30

..................... खाद्यतेल वाढलेलेच गेल्या चार महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दर उतरण्याऐवजी वाढतच चालले आहेत. रविवारी सोयाबीन, शेंगदाणा तेलाचे दर १० ते ...

Onion, garlic prices low! | कांदा, लसणाचे दर नीचांकी पातळीवर!

कांदा, लसणाचे दर नीचांकी पातळीवर!

Next

.....................

खाद्यतेल वाढलेलेच

गेल्या चार महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दर उतरण्याऐवजी वाढतच चालले आहेत. रविवारी सोयाबीन, शेंगदाणा तेलाचे दर १० ते १५ रुपये प्रतिकिलोने वाढलेले होते. यासह तूरडाळीच्या दरानेही उच्चांक गाठला आहे.

..........

फळांचे दरही वाढले

रविवारी संत्रा ४०, मोसंबी ६०, सफरचंद १४०, चिकू ६०, अंगूर १००, पपई ५०, अननस ७० रुपये प्रतिनग, नारळ ३० रुपये प्रतिनग, स्ट्रॉबेरी १००, केळी ३० रुपये डझन याप्रमाणे विक्री झाली. हे दर तुलनेने वाढले आहेत.

...........

कांदा ३० रुपये किलो

कांदे आणि बटाट्याचे दर गत आठवड्यात प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांवर पोहोचले होते. चालू आठवड्यात मात्र कांद्याला ३० रुपये तर आलूला केवळ १५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. लसणाचे दरही तब्बल १०० रुपयांनी उतरले आहेत.

.............

गेल्या काही आठवड्यांपासून वाढलेले पालेभाज्यांचे दर चालू आठवड्यात कमी झाले आहेत. विशेषत: कांदा, आलू, लसण, अद्रकच्या दरात घसरण झाल्याने मोठा दिलासा मिळाला. पत्ताकोबी, फुलकोबी, पालक, मेथी, कोथींबिरचे दरही कमी झाल्याने स्वयंपाकात विविधता ठेवणे शक्य होत आहे.

- संध्या आढाव

गृहिणी

............

गत आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात पालेभाज्यांचे दर अत्यंत कमी झाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे आठवडी बाजार हलविण्यात आल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. त्यातही प्रशासनाच्या आदेशानुसार ५ वाजेपर्यंत बाजार सुरू राहिल्याने नुकसान सहन करावे लागले.

- गोपाल इरतकर, भाजी विक्रेता

..................

संत्रा, मोसंबी, सफरचंद, चिकू, अंगूर, पपई, अननस, कच्चे नारळ, स्ट्रॉबेरी, केळी या सर्वच फळांचे दर वाढलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुकाने लवकरच बंद झाल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. आज दिवसभरदेखिल ग्राहकांचे प्रमाण तुलनेने कमीच राहिले.

बाळू राऊत, फळ विक्रेता

Web Title: Onion, garlic prices low!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.