अर्थसहाय्याच्या योजनांसाठी २२ जुलैपर्यंत करावा लागणार आॅनलाईन अर्ज !

By admin | Published: July 17, 2017 01:53 PM2017-07-17T13:53:25+5:302017-07-17T13:53:25+5:30

२२ जुलैपर्यंत आपले अर्ज तलाठ्यांकडे सादर न करता स्वत: महा ई सेवा केंद्र (सेतू) मध्ये जावून नोंदणी करावी .

Online application to be done by 22 July for finance subsidy plans! | अर्थसहाय्याच्या योजनांसाठी २२ जुलैपर्यंत करावा लागणार आॅनलाईन अर्ज !

अर्थसहाय्याच्या योजनांसाठी २२ जुलैपर्यंत करावा लागणार आॅनलाईन अर्ज !

Next

वाशिम : वाशिम तहसील कार्यालयांतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा २५ जुलै २०१७ रोजी आयोजित केली असून, लाभार्थ्यांनी २२ जुलैपर्यंत आपले अर्ज तलाठ्यांकडे सादर न करता स्वत: महा ई सेवा केंद्र (सेतू) मध्ये जावून नोंदणी करावी लागणार आहे. 
विशेष सहाय्य योजनेअंर्तगत असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, अंध, अपंग, विधवा, परितक्ता, घटस्फोटीत, अत्याचारित महीला, निराश्रीत वृध्द तसेच अनाथ यांना या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. यापूर्वी सदर प्रकरणे ही सबंधित गावच्या तलाठ्यामार्फत संजय गांधी निराधार योजना विभागात स्वीकारल्या जात होती. आता ही प्रकरणे आॅनलाईन पद्धतीने स्वीकारली जात आहेत. ज्या लाभार्थ्यांनी आपले अर्ज तलाठ्यांकडे दिले असतील त्यांनी आपली अर्ज परत घेऊन सेतु केंद्रामार्फत आॅनलाईन सादर करावेत. पात्र लाभार्थ्यांना २२ जुलैपर्यंत आपले अर्ज सेतूमार्फत सादर करावे लागणार आहेत.

Web Title: Online application to be done by 22 July for finance subsidy plans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.