आंतरजिल्हा बदलीसाठी उद्यापासून आॅनलाईन अर्जाची कार्यवाही !

By admin | Published: May 7, 2017 07:28 PM2017-05-07T19:28:43+5:302017-05-07T19:28:43+5:30

प्राथमिक शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न निकाली निघाला आहे.

Online application for change of inter-city tomorrow! | आंतरजिल्हा बदलीसाठी उद्यापासून आॅनलाईन अर्जाची कार्यवाही !

आंतरजिल्हा बदलीसाठी उद्यापासून आॅनलाईन अर्जाची कार्यवाही !

Next

वाशिम - गत कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्राथमिक शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न निकाली निघाला आहे.  ८ मे पासून इच्छूक शिक्षकांना संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.
गत काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद असल्याने शिक्षकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागले. आंतरजिल्हा बदली प्रकरण निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांकडून वारंवार झाली. शासनस्तरावर या मागणीचा सकारात्मक विचार झाल्याने आंतरजिल्हा बदली प्रकरणी शासनाने २४ एप्रिल २०१७ अन्वये सुधारीत धोरण निश्चित केले. त्यानुसार इच्छूक शिक्षकांना संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. सुरूवातीला विभागनिहाय जाहिर केलेल्या वेळापत्रकात आता काही बदल केले आहेत. त्यानुसार अमरावती विभागातील इच्छूक शिक्षकांना ८ मे ते १२ मे २०१७ या दरम्यान संबंधित गटशिक्षणाकारी कार्यालयात आॅनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांना इच्छूक शिक्षकांच्या सरल प्रणालीवरील नोंदी अद्ययावत करण्यात आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील सहाही पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात इच्छूक शिक्षकांना ८ मे पासून आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

Web Title: Online application for change of inter-city tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.