ऑनलाइन पीक व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:49+5:302021-07-17T04:30:49+5:30

यावेळी कृषी विस्तार शिक्षण विभागांतर्गत अग्रील एक्सटेन्शन या यूट्यूबच्या माध्यमातून सोयाबीन पिकावरील क्लोरोसिस म्हणजे फेरस अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे निर्माण ...

Online Crop Management Lessons | ऑनलाइन पीक व्यवस्थापनाचे धडे

ऑनलाइन पीक व्यवस्थापनाचे धडे

Next

यावेळी कृषी विस्तार शिक्षण विभागांतर्गत अग्रील एक्सटेन्शन या यूट्यूबच्या माध्यमातून सोयाबीन पिकावरील क्लोरोसिस म्हणजे फेरस अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी विकृती व त्यासंदर्भात व्यवस्थापन याबद्दल माहिती देण्यात येत आहे. ॲग्री एक्सटेन्शन चॅनलच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना बीजप्रक्रिया, पेरणी पद्धती, जैविक व रासायनिक निविष्ठांचा समतोल वापर, ठिबक सिंचनाचे महत्त्व व ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन, शासनाच्या विविध योजना, पीक संरक्षण, शेतकरी बांधवर्ग्यंत पोहोचविणे इत्यादीबाबत कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम चालू आहेत. रा.से.यो. स्वयंसेवक, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूत आणि कृषी महाविद्यालय, रिसोड कर्मचारीवृंद यांच्या संयुक्तरीत्या ऑनलाइनप्रणाली कार्यक्रम राबवीत आहेत. शेतकरी बांधवांसाठी ऑनलाइन पद्धतीसाठी कृषी महाविद्यालय रिसोड येथील प्राचार्य डॉ. ए.एम. अप्तुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, कृषी विस्तार शिक्षण विभाग प्रा. डी. डी. मसूडकर, प्रा. खोडके यांच्या अथक परिश्रमातून व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.

Web Title: Online Crop Management Lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.