वाशिम जिल्हयातील ७o खासगी शाळांची ऑनलाईन नोंदणी; प्रवेश अर्ज प्रक्रिया लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:16 PM2018-01-30T17:16:43+5:302018-01-30T17:19:59+5:30
वाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यासाठी २९ जानेवारीपर्यत जिल्हयातील ७० खासगी शाळांचीऑनलाईन नोंदणी झाली आहे.
वाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यासाठी २९ जानेवारीपर्यत जिल्हयातील ७० खासगी शाळांचीऑनलाईन नोंदणी झाली आहे.
शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी संबंधित शाळांना आॅनलाईन नोंदणी करून माध्यम, प्रवेशित क्षमता आदी माहिती सादर करावी लागते. वाशिम जिल्ह्यात २५ जानेवारीपर्यंत शाळांचा अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे ऑनलाईन नोंदणीसाठी शाळांना ३० जानेवारी अशी अंतिम मुदत देण्यात आली. २९ जानेवारीपर्यत ७० शाळांची नोंदणी झाली. शेवटच्या दिवशी १०-१५ शाळांची नोंदणी होईल, असा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी व्यक्त केला. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी स्तरावरून या माहितीची खातरजमा झाल्यानंतर विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविली जाते. गतवर्षी वाशिम जिल्हयात एकूण ८२ शाळांनी ऑनलाईन नोंदणी होती.